शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

John Abraham: जॉन अब्राहमचा १ एप्रिलला 'अटॅक', कोविडनंतर दणक्यात पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 20:01 IST

जॉन अब्राहम अभिनित 'अटॅक' हा चित्रपट १ एप्रिल, २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत

जॉन अब्राहमचा अँक्शन पॅक्ड 'अटॅक' १ एप्रिलला

जॉन अब्राहम अभिनित 'अटॅक' हा चित्रपट १ एप्रिल, २०२२ रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. जॅकलीन फर्नांडिस आणि रकुल प्रीत सिंग यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. लक्ष्य राज आनंद यांनी दिग्दर्शित केलेला, अटॅकचा पहिला भाग अँक्शन पॅक्ड आहे. भविष्यातील युद्धे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यावर लढली जातील, यावर आधारित हा सिनेमा आहे. यातील जबरदस्त ॲक्शन सीन्स आणि कथा मनोरंजक आहे. अटॅकचा टीझर आणि ट्रेलर अद्याप प्रदर्शित झालेले नाहीत. निर्माते जयंतीलाल गडा (पेन स्टुडिओ) यांनी सांगितले की, “यात जॉन एक सुपर-सैनिक आहे. आणि अटॅकची संकल्पना खूप मनोरंजक आहे. जॉन अब्राहम, जॅकलीन फर्नांडिस सोबत रकुल प्रीत सिंग, प्रकाश राज,रत्ना पाठक शाह यांच्या भूमिका आहेत. डॉ. जयंतीलाल गाडा (पेन स्टुडिओ),जॉन अब्राहम (जेए एंटरटेनमेंट),आणि अजय कपूर प्रॉडक्शन या सिनेमाचे निर्माते आहेत.

सबाच्या व्हिडिओवर हृतिकची कमेंट

काही दिवसांपासून अभिनेता हृतिक रोशनच्या सबा आझादसोबतच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. कधी दोघंही लंच किंवा डिनरला जाताना दिसतात तर कधी एकमेकांच्या कुटुंबीयांसोबत टाइम स्पेंड करतात. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटो किंवा व्हिडिओवर कमेंट करतात. आताही हृतिकनं सबाच्या पोस्टवर केले कमेंटमुळे दोघं पुन्हा चर्चेत आले आहेत. सत्यजीत रे यांच्या क्लासिक ‘‘गोपी जाने बाघा बायने’चं एक बंगाली गाणं गुनगुनताना सबानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने म्हटलंय की, बालपणी ती या अल्बममधील प्रत्येक गाणं शिकली होती. पण त्यावेळी तिला ही भाषा अजिबात समजत नव्हती. सबाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना हृतिक रोशननं लिहिलं, ‘तू एक असामान्य व्यक्ती आहेस.’ हृतिकच्या या कमेंटला सबानं उत्तर दिलं आहे. तिने लिहिलं, ‘आणि तू सर्वात दयाळू व्यक्ती आहेस..’ या कमेंट्सनंतर या दोघांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाण आहे.

वरुण सूदसोबत दिव्या अग्रवालचे ब्रेकअप

बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवाल हिने प्रियकर वरुण सूद सोबत वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. वरुण आणि दिव्या एस ऑफ स्पेस या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झाले तेव्हापासून एकमेकांना डेट करत होते. दोघे याशो दरम्यान ते जवळ आले आणि वरुणने तिला घरातच प्रपोज केले. त्यांच्या ब्रेकअपची घोषणा करताना, दिव्याने रविवारी, इंस्टाग्रामवर दीर्घ भावनिक ब्रेक-अप नोटसह स्वतःचे एक मोनोक्रोम चित्र पोस्ट केले. मात्र, विभक्त होण्याचे कारण सांगितले नाही. तिच्या चिठ्ठीत दिव्याने लिहिले की, "मी औपचारिकपणे घोषित करते की मी, या जीवनात एकटी आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगण्यासाठी वेळ काढू इच्छिते. मी त्याच्यासोबत घालवलेले सर्व आनंदाचे क्षण मला खरोखर आवडतात आणि तो एक चांगला माणूस आहे! तो नेहमीच माझा चांगला मित्र असेल. कृपया माझ्या निर्णयाचा आदर करा. त्यांच्या ब्रेकच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी त्यांची निराशा व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ritesh Deshmukhरितेश देशमुखkolhapurकोल्हापूरJohn Abrahamजॉन अब्राहमcinemaसिनेमा