आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST2020-12-08T04:22:05+5:302020-12-08T04:22:05+5:30

राजकीय समझोत्यानुसार लोकनियुक्त सरपंच मनिषा प्रकाश पाटील यांनी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ...

Geeta Patil as Akurde Sarpanch | आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील

आकुर्डे सरपंचपदी गीता पाटील

राजकीय समझोत्यानुसार लोकनियुक्त सरपंच मनिषा प्रकाश पाटील यांनी तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदी ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायत सदस्या गीता भगवान पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून कळे मंडळ अधिकारी सुरेश ठाकरे यांनी काम पाहिले.

स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेविका शिंगाडे यांनी केले. निवडीनंतर सुरेश ठाकरे यांच्या हस्ते सरपंचांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तंटामुक्त अध्यक्ष तुकाराम पाटील , अजित पाटील, सरदार पाटील, विश्वास पाटील, धैर्यशील पाटील, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, विलास पाटील, भगवान पाटील ,युवराज गुरव (पो. पाटील) संजय गुरव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ : गीता पाटील

Web Title: Geeta Patil as Akurde Sarpanch