गवळी समाजाला ‘एनटी’च्या सुविधा मिळाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:24 IST2021-01-03T04:24:17+5:302021-01-03T04:24:17+5:30
कोल्हापूर : गवळी समाजाला ‘एन. टी.’च्या सुविधा मिळाव्यात, समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापन व्हावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर ...

गवळी समाजाला ‘एनटी’च्या सुविधा मिळाव्यात
कोल्हापूर : गवळी समाजाला ‘एन. टी.’च्या सुविधा मिळाव्यात, समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापन व्हावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूर जिल्हा गवळी समाज महासंघाच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांना देण्यात आले.
प्रत्येक जिल्हा दूध महासंघावर गवळी समाजाचा प्रतिनिधी नेमावा, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळावर गवळी समाजाचा प्रतिनिधी नेमावा, अशाही मागण्या करण्यात आल्या. पालकमंत्री पाटील यांनी गवळी समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली. यावेळी अशोक दाते, कृष्णात डाकरे, युवराज गवळी, अनंत पंदारे, उदय डाकवे, दिलीप गवळी आदी उपस्थित होते.
फोटो : ०२०१२०२० कोल गवळी समाज
ओळी : कोल्हापूर जिल्हा गवळी समाज महासंघाच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे समाजाच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.