आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत गौरी डाकवे प्रथम
By Admin | Updated: September 11, 2014 00:12 IST2014-09-10T22:34:52+5:302014-09-11T00:12:08+5:30
मलेशिया योगा असोसिएशनतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली

आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत गौरी डाकवे प्रथम
चिपळूण : सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणारी गौरी डाकवे हिने आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत ९ ते १० वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. मलेशिया योगा असोसिएशनतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती.
असोसिएशन आॅफ मुंबई गोवा डिस्ट्रीक्टतर्फे महापौर राज्यस्तरीय योगा स्पर्धा झाली. या स्पर्धेतही गौरी हिने द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाचे नाव जिल्ह्याच्या यादीत चमकविले आहे. या यशाबद्दल परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सुधाकर भागवत, माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मनीष भागवत, प्राथमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष पराग भावे, मुख्याध्यापक साक्षी गोरिवले, पर्यवेक्षक मंजुषा चिटणीस, क्रीडाशिक्षक योगेश पेढांबकर तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)