शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Leopard in Kolhapur: बिबट्या आला, पोलिसांना फोन केले, पण हलक्यात घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:18 IST

अन्य शाळा न सोडण्याचा आदेश.. पालकांना मेसेज

कोल्हापूर : सोमवारी रात्री साडेबारा वाजता मेरी वेदर मैदानात काही जणांना बिबट्या दिसला. मी आजोबाच्या काळजीपोटी तातडीने विवेकानंद कॉलेज परिसरात दाखल झालो. तेथून पहिल्यांदा नियंत्रण कक्ष (१०० नंबर), शाहुपुरी, जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क झाला, पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला. सकाळी साडेआठ वाजता पुन्हा विवेकानंद कॉलेज परिसरातच तो दिसला, अशी माहिती गौरव डोंगरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.ते म्हणाले, आमचे आजोबा प्राचार्य अभयकुमार साळुंखे विवेकानंद कॉलेज परिसरात राहतात. मी जवळच नागाळा पार्कात राहतो. मला साडेबारा वाजता मेरी वेदर मैदानात बिबट्याचे दर्शन झाल्याने कळताच, पोलिस प्रशासनास अलर्ट करण्याचा प्रयत्न केला. कॉलेजचे प्राचार्य, शिक्षकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. सकाळी साडेअकरा वाजता कॉलेज परिसरातील एका हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण राहिले.अन्य शाळा न सोडण्याचा आदेश.. पालकांना मेसेजविवेकानंद महाविद्यालयासह परिसरात होली क्रॉस कान्व्हेंट स्कूल, सेंट झेव्हियर्स स्कूल या शाळा आहेत. या शाळांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने बिबट्या जेरबंद होईपर्यंत शाळा सोडू नये, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. परिसरात बिबट्या आल्याचे समजताच काही शाळा घाईने विद्यार्थ्यांना घरी सोडतील, अशी शक्यता होती; मात्र विद्यार्थी बाहेर आले तर गर्दी होऊन अधिकच धोका निर्माण झाला असता त्यामुळे प्रशासनाने ही सूचना दक्षता घेतली. पालकांना भीती वाटू नये, यासाठी शाळांनी पालकांच्या व्हॉट्सॲपवर आपले पाल्य शाळेत सुरक्षित असून, शाळा नेहमीप्रमाणे ठरलेल्या वेळेत सायंकाळी साडेपाच वाजता सुटतील, असा मेसेज पाठवला. त्यामुळे पालकांनी नि:श्वास सोडला