गौराई, शंकरोबाची बाजारपेठेत टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:23 IST2021-09-13T04:23:13+5:302021-09-13T04:23:13+5:30

कोल्हापूर : हवामानातील बदल आणि अति पावसामुळे यंदा तेरडा (गौराई) आणि द्रोणपुष्पी(शंकरोबा) या तणवर्गीय वनस्पतीची टंचाई बाजारपेठेत तीव्रपणे जाणवत ...

Gaurai, Shankaroba market scarcity | गौराई, शंकरोबाची बाजारपेठेत टंचाई

गौराई, शंकरोबाची बाजारपेठेत टंचाई

कोल्हापूर : हवामानातील बदल आणि अति पावसामुळे यंदा तेरडा (गौराई) आणि द्रोणपुष्पी(शंकरोबा) या तणवर्गीय वनस्पतीची टंचाई बाजारपेठेत तीव्रपणे जाणवत आहे. गणेशोत्सवात याला मागणी आहे, पण गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत विक्रीसाठी ही वनस्पती कमी उपलब्ध राहिली. यामुळे लहान पेंडीचा दर ५० रुपयांपेक्षा अधिक राहिला.

गणेशोत्सवात गौराई पूजनाला महत्त्व आहे. रविवारी सकाळी घराघरात याचे पूजन करण्यासाठी तेरडा आणि द्रोणपुष्पी वनस्पती खरेदीसाठी शहरातील सर्वच प्रमुख बाजारपेठेत महिलांची गर्दी झाली होती, पण गेल्या वर्षीपेक्षा या वनस्पतीची आवक बाजारात कमी राहिली. परिणामी, दरही वधारले होते.

गौरीपूजनाच्या दिवशी पन्हाळा, करवीर आणि शहरातील आजूबाजूचे शेतकरी ही वनस्पती विक्रीसाठी आणतात. डोंगराळ भागात ही वनस्पती अधिक असते, पण यंदा अति पाऊस झाल्याने आणि हवामान पोषक नसल्याने या वनस्पतीची उगवण, वाढ अपेक्षित प्रमाणात झाली नाही. यापूर्वी सहजपणे उपलब्ध होणारी ही वनस्पती यंदा शेतकऱ्यालाही आपल्या घरात पूजनासाठी शोधावी लागली. विक्रीसाठी बाजारातही कमी आली. त्याची टंचाई निर्माण झाली. याचा गैरफायदा घेण्यासाठी काही विक्रेत्यांनी तेरडा आणि द्रोणपुष्पीसारखीच दिसणारी दुसरी वनस्पती विक्रीसाठी घेऊन आले होते, पण वर्षानुवर्षे गौरी पूजन करणाऱ्या महिलांनी निवड करून तेरडा, द्रोणपुष्पीच गौरी, शंकरोबाच्या पूजनासाठी घेऊन जात होते.

चौकट

त्वचा रोगासाठी उपयोगी

तेरडा, द्रोणपुष्पी वनस्पतीची पाने उगाळून लावल्यास त्वचारोग कमी होतो, असे वनस्पती अभ्यासक सांगतात. त्याच्या फुलांचा रंगही वेगवेगळा असतो. फुलांपासून रंगही तयार करता येते. म्हणून या वनस्पती बहुउपयोगी म्हणून समजली जाते.

कोट

तेरडा, द्रोणपुष्पी वनस्पती बहुउपयोगी आहे. तणवर्गीय असल्याने वाढ चांगली असते. यंदा अती पाऊस, हवामानातील आमूलाग्र बदलामुळे या वनस्पतीची कमतरता दिसते. यंदा पूजन केलेली ही वनस्पती परिपक्व अवस्थेत असल्याने बिया आहेत. गणेश विसर्जन दिवशी त्या बिया काढून शेताच्या बांधावर किंवा डोंगरावर टाकाव्यात. जेणेकरून पुढील वर्षी याची टंचाई भासणार नाही.

अनिल चौगुले, निसर्ग मित्र

Web Title: Gaurai, Shankaroba market scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.