शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: मासा बेलेवाडी-बोळावी परिसरात गव्यांचा कळप, रातोरात करतायंत उभे पीक फस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 19:05 IST

पाण्याची मुबलक सोय, घणदाट जंगल व खाण्यासाठी भरपूर पिके या परिसरात उपलब्ध असल्याने गव्यांचा वावर

शशिकांत भोसलेसेनापती कापशी: मासा बेलेवाडी (ता.कागल) येथील पाझर तलाव परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांकडून रातोरात शेतातील उभे पीक फस्त केले जात आहे. आज, बुधवारी दुपारच्या सुमारास सेनापती कापशी - मुरगुड मार्गावर बेलेवाडी मासा पाझर तलावाकडुन वीस गवारेड्यांचा कळप रस्ता पार करुन हळदवडे कडील जंगलात जाताना शेतकऱ्यांनी पाहिला. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बाळेघोल येथे गेल्या आठवड्यात लावण केलेला सुमारे एक एकर ऊस गव्यांनी रात्रीत फस्त केला होता. वनविभागाच्यावतीने नुकसान भरपाई लांबच साधी चौकशीही केली जात नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.             शेतकऱ्यांनी नुकत्याच ऊसाच्या लावणी केल्या आहेत, शाळु, गहू, हरभरा पीक आता हातातोंडाशी आलेले आहे. या पार्श्वभूमीवर चिकोत्रा खोऱ्यात वाढलेल्या गव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बेलेवाडी मासा, बोळावी, हसुर बुद्रुक, हसुर खुर्द, बाळेघोल, बाळिक्रे व हणबरवाडी येथील डोंगर परिसरात घनदाट जंगल व चार पाझर तलाव आहेत. पाण्याची मुबलक सोय, घणदाट जंगल व खाण्यासाठी भरपूर पिके या परिसरात उपलब्ध आहेत. परिणामी या परिसरात गव्यांनी मोठ्या कळपाने कायमस्वरूपी डेरा टाकला आहे. यामुळे डोंगराजवळ असणारी शेती संकटात सापडली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर