शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 18:17 IST

Rain Kolhapur : पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा उघडला.

ठळक मुद्देदुपारनंतर पावसाचा जोर वाढलाखुले झालेले बंधारे पुन्हा पाण्याखाली

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा उघडला.धरणातून २८२८क्यूसेक्स विसर्ग भोगावती पात्रात सुरु झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरु राहिली, दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला. त्यामुळे खुले होत असलेले बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले. आता पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ३४ वर गेली आहे.दरम्यान पाणलोट क्षेत्रातही चांगलाच पाऊस कोसळत आहे. पाटगाव जलाशयात १०५ मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे. इतर सर्वच जलाशयात साधारपणे ३० ते ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातील पाऊस आणि उर्वरीत जिल्ह्यात अधून मधून कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.. शुक्रवारपर्यंत केवळ ३३ बंधारेच पाण्याखाली राहिले होते, शुक्रवारी खुला झालेला दूधगंगा नदीवरील सुळंबी बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला.दूधगंगा धरण ८४ टक्के भरले असलेतरी त्यातून ६२०० क्यूसेक्स प्रतिसेकंद विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरु असल्याने नदीची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. नदीवरील पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांची संख्या पाचवर पोहचली आहे.

वारणेतूनही १४ हजार क्यूसेक विसर्ग सुरु असल्याने नदीवरील ९ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली आहे. दरम्यान पंचगंगा नदीला आलेला महापूर ओसरु लागला होता. शुक्रवारी ३७ फुटापर्यंत पाणीपातळी कमी आली होती.

शनिवारी दुपारपर्यंत त्यात आणखी फुटाने घट होऊन ती ३६ फुटावर आली होती. नदी हळूहळू पात्राच्या आत सरकत असताना पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातून विसर्ग १४०० क्यूसेकने वाढल्याने पाणी पुन्हा चढू लागले आहे.पाण्याखालील बंधारे

  • पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
  • तुळशी: आरे, बीड,
  • वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी, मांगले सावर्डे
  • कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे
  • वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली
  • दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली, सुळंबी 

धरणातील विसर्ग (क्यूसेकमध्ये)

  • राधानगरी २८००
  • तुळशी १५२१
  • वारणा १४३६९
  • दूधगंगा ६२००
  • कासारी १२५०
  • कडवी ८६५
  • कुंभी १०००
  • पाटगाव २५०
  • चिकोत्रा ५६०
  • चित्री ५२१
  • जंगमहट्टी १९९
  • घटप्रभा ४११५
  • जांबरे २७३
  • आंबेओहोळ ९७
  • कोदे १००

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर