राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 06:14 PM2021-07-31T18:14:09+5:302021-07-31T18:17:10+5:30

Rain Kolhapur : पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा उघडला.

A gate of Radhanagari Dam reopened | राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

राधानगरी धरणाचा एक दरवाजा पुन्हा उघडला

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारनंतर पावसाचा जोर वाढलाखुले झालेले बंधारे पुन्हा पाण्याखाली

कोल्हापूर: पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी बंद झालेला राधानगरीचा सहाव्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पाऊस वाढल्याने शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा उघडला.

धरणातून २८२८क्यूसेक्स विसर्ग भोगावती पात्रात सुरु झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान शनिवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरु राहिली, दुपारनंतर मात्र चांगलाच जोर धरला. त्यामुळे खुले होत असलेले बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले. आता पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या ३४ वर गेली आहे.

दरम्यान पाणलोट क्षेत्रातही चांगलाच पाऊस कोसळत आहे. पाटगाव जलाशयात १०५ मिलीमीटर इतकी अतिवृष्टी झाली आहे. इतर सर्वच जलाशयात साधारपणे ३० ते ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रातील पाऊस आणि उर्वरीत जिल्ह्यात अधून मधून कोसळणाऱ्या जोरदार सरीमुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे.. शुक्रवारपर्यंत केवळ ३३ बंधारेच पाण्याखाली राहिले होते, शुक्रवारी खुला झालेला दूधगंगा नदीवरील सुळंबी बंधारा पुन्हा पाण्याखाली गेला.

दूधगंगा धरण ८४ टक्के भरले असलेतरी त्यातून ६२०० क्यूसेक्स प्रतिसेकंद विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सुरु असल्याने नदीची पाणीपातळी पुन्हा वाढू लागली आहे. नदीवरील पाण्याखाली जाणाऱ्या बंधाऱ्यांची संख्या पाचवर पोहचली आहे.

वारणेतूनही १४ हजार क्यूसेक विसर्ग सुरु असल्याने नदीवरील ९ बंधारे पूर्णपणे पाण्याखाली आहे. दरम्यान पंचगंगा नदीला आलेला महापूर ओसरु लागला होता. शुक्रवारी ३७ फुटापर्यंत पाणीपातळी कमी आली होती.

शनिवारी दुपारपर्यंत त्यात आणखी फुटाने घट होऊन ती ३६ फुटावर आली होती. नदी हळूहळू पात्राच्या आत सरकत असताना पावसाचा जोर वाढल्याने राधानगरी धरणातून विसर्ग १४०० क्यूसेकने वाढल्याने पाणी पुन्हा चढू लागले आहे.

पाण्याखालील बंधारे

  • पंचगंगा: शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
  • भोगावती: हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे
  • तुळशी: आरे, बीड,
  • वारणा: चिंचोली, माणगाव, कोडोली, शिगाव, तांदूळवाडी, चावरे, खोची, दानोळी, मांगले सावर्डे
  • कासारी: यवलूज, पुनाळ, तिरपण, ठाणे आळवे
  • वेदगंगा: कुरणी, बस्तवडे, सुरुपली, चिखली
  • दूधगंगा: दत्तवाड, बाचणी, सुळकूड, सिध्दनेर्ली, सुळंबी
     

धरणातील विसर्ग (क्यूसेकमध्ये)

  • राधानगरी २८००
  • तुळशी १५२१
  • वारणा १४३६९
  • दूधगंगा ६२००
  • कासारी १२५०
  • कडवी ८६५
  • कुंभी १०००
  • पाटगाव २५०
  • चिकोत्रा ५६०
  • चित्री ५२१
  • जंगमहट्टी १९९
  • घटप्रभा ४११५
  • जांबरे २७३
  • आंबेओहोळ ९७
  • कोदे १००

 

Web Title: A gate of Radhanagari Dam reopened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.