बटकणंगले येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती

By Admin | Updated: November 13, 2014 00:41 IST2014-11-13T00:39:13+5:302014-11-13T00:41:43+5:30

तहसीलदारांची भेट : आरोग्य पथक गावात ठाण मांडून

Gastroscope scenario at Batcangle | बटकणंगले येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती

बटकणंगले येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती

नेसरी : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे गॅस्ट्रोसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. आतापर्यंत ३३ रुग्णांची तपासणी झाली असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी एम. व्ही. अथणी यांनी सांगितले.
याबाबत गावातून व आरोग्य यंत्रणेकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवार (दि. ९)पासून बटकणंगले गावातील काही नागरिकांना उलट्या सुरू झाल्या होत्या. मात्र, रुग्णांची संख्या वाढत गेल्याने नागरिक भांबावले. परिस्थितीचा अंदाज पाहून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. व्ही. अथणी यांच्या मार्गदर्शनाखाली कानडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक बटकणंगले गावात दाखल असून, रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. मात्र, काही घाबरण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सांगण्यात आले.
सोमवारपासून आज, बुधवारपर्यंत २७ रुग्णांवर उपचार करून घरी सोडण्यात आले, तर सहा रुग्णांना सलाईन लावण्यात आले होते. बटकणंगले ग्रामपंचायतीच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य पथक कार्यरत आहेत. दरम्यान, गावातील परिस्थिती पाहून आरोग्य पथकासह दीपक जाधव, जि. प. सदस्या मीनाताई जाधव, सरपंच निर्मिती गोरुले आदीनी गावात कुठे पाईपलाईन गळती आहे का? तसेच तारओहोळ नदी जॅकवेलवरून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या ठिकाणची तपासणी केली. (वार्ताहर)

Web Title: Gastroscope scenario at Batcangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.