शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पाईपलाईनने गॅस पुरवठा ‘गॅस’वर, खुदाईचा दर कळीचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 1:27 PM

कोल्हापूर शहरामध्ये पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, महापालिकेचा खुदाई खर्च यामध्ये अडथळा ठरत आहे. पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असून, महापालिकेला खुदाई खर्च म्हणून ३४ कोटी जमा करावे लागणार आहेत. गॅस पुरवठा करणारी कंपनी इतकी रक्कम जमा करण्यास तयार नसून, सवलत देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देपाईपलाईनने गॅस पुरवठा ‘गॅस’वर, खुदाईचा दर कळीचा मुद्दा महापालिकेचे दर कंपनीच्या आवाक्याबाहेर

विनोद सावंतकोल्हापूर : शहरामध्ये पाईपलाईनने गॅस पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, महापालिकेचा खुदाई खर्च यामध्ये अडथळा ठरत आहे. पहिल्या टप्प्यात ७० किलोमीटर पाईपलाईन टाकण्यात येणार असून, महापालिकेला खुदाई खर्च म्हणून ३४ कोटी जमा करावे लागणार आहेत. गॅस पुरवठा करणारी कंपनी इतकी रक्कम जमा करण्यास तयार नसून, सवलत देण्याची मागणी केली आहे.हिंदुस्थान पेट्रोलियम आॅईल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रत्नागिरी ते कर्नाटक अशी पाईपलाईनने गॅस पुरवठा करणार आहे. यामुळे कोल्हापूर शहरातील ग्राहकांना थेट पाईपलाईनने घरांमध्ये गॅस पुरवठा होणार आहे. महापालिकेच्या मागील महिन्यात झालेल्या महासभेत याबाबतचा सदस्य प्रस्तावही मंजूर झाला आहे. महापालिकेकडून यासंदर्भात माहिती संकलित केली जात आहे. पाईपलाईनमुळे रस्त्यांची खुदाई होणार असून, कंपनीकडून खुदाई खर्च घ्यावा लागणार आहे. यानंतर आॅफिस प्रस्ताव ठेवला जाणार आहे.कंपनीकडून १०० रुपये रनिंग मीटर दराची मागणीमहापालिकेचा सध्याचा खुदाई दर हा ४५०० रुपये प्रति रनिंग मीटर इतका आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी शहरातील ७० किलोमीटर पाईपलाईन टाकणार आहे. महापालिकेला यासाठी सुमारे ३४ कोटी रुपये जमा करावे लागणार आहेत. संपूर्ण शहरात अशा प्रकारे पाईपलाईन टाकण्यासाठी कोट्यवधींचा खर्च येणार आहे. त्यामुळे कंपनीने नाशिक महापालिकेच्या धर्तीवर १०० रुपये रनिंग मीटरप्रमाणे दर आकारणी करण्याची मागणी केली आहे.

  • पहिल्या टप्प्यात टाकण्यात येणारी पाईपलाईन - ७० किलोमीटर
  • प्रभाग - कावळा नाका येथील ७ प्रभाग
  • पहिल्या टप्प्यात गॅसपाईपलाईनचे होणारे काम

कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, सदर बाजार, महाडिक वसाहत, मुक्त सैनिक वसाहत, रुईकर कॉलनी.

  • महापालिकेचा खुदाई खर्च -४५०० प्रति रनिंग मीटर
  • गॅसपाईपलाईनचे फायदे
  • कंपनीची मागणी -१०० रुपये प्रति रनिंग मीटर
  • महापालिकेची मागणी-३४ कोटी
  • कंपनीची मागणी -७ कोटी
  • गॅसपुरवठा थेट घरामध्ये मिळणार.
  •  सध्याच्या दरापेक्षा कमी दरात गॅस मिळणार.
  • गॅससाठी नंबर लावण्याची अथवा रांगेत उभारण्याची गरज नाही.
  • अचानक गॅस संपण्याची चिंता नाही.

पाईपलाईनने गॅस पुरवठ्यामुळे रस्ते खराब होणार आहेत. किमान खुदाई केलेल्या रस्त्याचा खर्च तरी कंपनीकडून महापालिकेला मिळावा, यासाठी नव्याने प्रस्ताव केला जात आहे. यास महासभेने मंजुरी दिली तर हे शक्य होणार असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली आहे.भूमिगत विद्युतवाहिनीची पुनरावृत्ती नकोशहरातील अडथळा ठरणारे तसेच धोकादायक विद्युतवाहिनी भूमिगत टाकण्यासाठी राज्य शासनाने निधी दिला होता. महावितरणने खुदाई खर्च कमी करण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. महासभेने हा प्रस्ताव फेटाळला. मिळालेला निधी परत गेला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर