गुऱ्हाळघरे आजपासून बंद

By Admin | Updated: December 14, 2014 23:58 IST2014-12-14T22:30:44+5:302014-12-14T23:58:49+5:30

दर घसरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक

Gardens closed today | गुऱ्हाळघरे आजपासून बंद

गुऱ्हाळघरे आजपासून बंद

कोल्हापूर : कवडीमोल दराने गुळाची विक्री करावी लागत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उद्या, सोमवारपासून गुऱ्हाळघरे बारा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाने महिनाभर वाऱ्यावर सोडल्याने शेतकरी आक्रमक झाले असून, बुधवारी
(दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारला जाग आणण्याचा निर्धारही करण्यात आला.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये आज गूळ उत्पादकांची ज्येष्ठ नेते
प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यामध्ये गुऱ्हाळघरे बंद करून शासनाशी संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रास्ताविकात गूळ उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी महिन्याभरातील गुळाच्या दराचा आढावा घेत गुऱ्हाळमालकांचा ताळेबंद मांडला. संघर्ष करूया, पण गुळासाठी पर्यायी व्यवस्थाही केली पाहिजे, अशी मागणी शिवाजी मगदूम यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Gardens closed today