वारणा महाविद्यालयास माळी यांनी दिली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:05 IST2021-02-05T07:05:21+5:302021-02-05T07:05:21+5:30
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयास सहायक आयुक्त संजय माळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा वारणा विभाग शिक्षण मंडळात प्रशासकीय ...

वारणा महाविद्यालयास माळी यांनी दिली भेट
येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयास सहायक आयुक्त संजय माळी यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा वारणा विभाग शिक्षण मंडळात प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
यावेळी माळी यांनी कौशल विकास उपक्रम आणि रोजगार उद्योजकतासंदर्भात प्राध्यापकांना त्यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर यांनी इयत्ता १० वीपासूनच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची गरज असून वारणा त्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे.
या कार्यक्रमास योगेश उंडाळे, प्रा. वैभव बुड्ढे, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर, प्रा. नितीन कळंत्रे, प्रा. एन.बी. जाधव, दादासाहेब बच्चे व प्राध्यापक उपस्थित होते. नॅक समन्वयक डॉ. एस. एस. खोत यांनी स्वागत केले, तर प्रा. नितीन कळंत्रे यांनी आभार मानले.