शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

उद्यान दिंडीने गार्डन्स क्लबच्या कोल्हापूर पुष्पप्रदर्शनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:20 IST

झाडे लावा... झाडे जगवा..., झाड दत्तक घेऊया ..., झाडांना करू नका नष्ट...श्वास घेताना होतील कष्ट..., असा संदेश देत उद्यान दिंडीने शुक्रवारी तीन दिवसीय कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला

ठळक मुद्देगुलाबासह ३० प्रकारची आकर्षक फुले पामसह दहा प्रकारची पाने : उद्यान अवजारांसह विविध प्रकारचे ३० स्टॉल्स

कोल्हापूर : झाडे लावा... झाडे जगवा..., झाड दत्तक घेऊया ..., झाडांना करू नका नष्ट...श्वास घेताना होतील कष्ट..., असा संदेश देत उद्यान दिंडीने शुक्रवारी तीन दिवसीय कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबच्या पुष्पप्रदर्शनाला सुरुवात झाली. गुलाब, लिमोनियम, जर्बेरा, आर्केड, लॅटिस, पिंक पॉँग, टॉर्च झिंजर अशा विविध ३० प्रकारच्या फुलांचा, तर पामसह १0 प्रकारच्या पानांचा प्रदर्शनात समावेश आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

महावीर गार्डन येथे सकाळी ९ वाजता महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते रोपांच्या पालखीचे पूजन होऊन उद्यान दिंडीला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती शांतादेवी डी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक अरुण नरके, नगरसेवक विजय सूर्यवंशी, नगरसेवक सत्यजित कदम, गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, आदींची होती.

‘झाडे लावा...झाडे जगवा...’, ‘झाड दत्तक घेऊया...’, अशा घोषणा देत ही दिंडी आदित्य कॉर्नर, ताराबाई पार्कमार्गे न्यू शाहूपुरीतील ताराबाई गार्डन येथे विसर्जित झाली. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे एन. एस. एस.चे विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, गार्डन्स क्लबचे सदस्य सहभागी झाले होते. यानंतर नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्या हस्ते प्रदर्शनातील स्टॉल्सचे उद्घाटन झाले.

या ठिकाणी उद्यानाला लागणारी अवजारे, विविध फुले, फुलझाडे, रोपे, औषधी वनस्पती, लॉन्स, नर्सरीज, खाद्यपदार्थ, असे विविध प्रकारे ३० स्टॉल्स आहेत. दिवसभर या ठिकाणी नागरिकांनी भेट देऊन माहिती घेतली. सायंकाळी सहा वाजता स्वरांगण प्रस्तूत निसर्गसंगीत संध्या हा कार्यक्रम झाला. ‘फुलले मनी चांदणे’ या शिर्षकाखाली रंगलेल्या गायक, वादक यांच्या मैफलीने सायंकाळी रसिक मंत्रमुग्ध झाले.

दरम्यान, सकाळच्या सत्रात लॅँडस्केपिंग स्पर्धा झाली. यामध्ये न्यू आर्किटेक्चर कॉलेज व कलानिकेतन महाविद्यालयाचे ३० विद्यार्थी सहभागी झाले होते. आज, शनिवारी व उद्या, रविवारी फ्लॉवर शो होणार आहे. यामध्ये फ्लॉवर ड्रिंक, इकेबाना पुष्परचना, पेपर फ्लॉवर मेकिंग, फ्लोरल हेअर अ‍ॅक्सेसरीज यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. पुष्परचना, लॅँडस्केपिंग, फॅशन शोसह उद्या, रविवारी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे.यावेळी क्लबचे उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, खजानीस राज अथणे, आदी उपस्थित होते.गार्डन्स क्लबफोटो ओळी : कोल्हापूर महापालिका व गार्डन्स क्लबतर्फे आयोजित पुष्पप्रदर्शनाची सुरुवात शुक्रवारी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते महावीर गार्डन येथे उद्यान दिंडीच्या उद्घाटनाने झाली. यावेळी शांतादेवी डी. पाटील, शशिकांत कदम, कल्पना सावंत, आदी उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार) 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका