बापट कॅम्प रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:39+5:302021-07-01T04:17:39+5:30
सध्या बापट कॅम्प परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच ...

बापट कॅम्प रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य
सध्या बापट कॅम्प परिसरात गणेशमूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरात डेंग्यू व चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच जाधववाडी ते बापट कॅम्प, मार्केट यार्ड ते बापट कॅम्पला जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी असणारे कचरा कोंडाळे पालिकेने काढून टाकले असून, पालिकेची घंटागाडीही आठवड्यातून दोन दिवसच येत आहे. त्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून लोकांच्या आरोग्याशी पालिका खेळत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जाधववाडी रस्त्यावरदेखील हीच परिस्थिती असून, याठिकाणी मोठ्या कचराकुंड्यांची व्यवस्था नसल्याने कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने जाधववाडी, बापट कॅम्प परिसरातील कचऱ्याचा उठाव करावा, अशी मागणी होत आहे.
फोटो : ३० बापट कॅम्प परिसर
ओळ : बापट कॅम्प परिसरातील रस्त्यावर असे कचऱ्याचे ढीग पडले आहेत. (छाया दीपक जाधव)
--------