ट्रॅक्टर चालक नसल्याने हलकर्णी येथे कचरा उठाव बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST2021-05-20T04:26:12+5:302021-05-20T04:26:12+5:30
साधारण ८ लाख रुपये कर्ज स्वरुपात उभारून हलकर्णी ग्रामपंचायतीने गावातील कचरा उठावासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टर चालक नसल्याने थांबून ...

ट्रॅक्टर चालक नसल्याने हलकर्णी येथे कचरा उठाव बंद
साधारण ८ लाख रुपये कर्ज स्वरुपात उभारून हलकर्णी ग्रामपंचायतीने गावातील कचरा उठावासाठी खरेदी केलेला ट्रॅक्टर चालक नसल्याने थांबून आहे. यामुळे गावातील कचरा उठाव तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे.
हलकर्णी गावचा विस्तार वाढला आहे. गावात बाजारही भरत असल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साठतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने ट्रॅक्टर खरेदी केला होता. जो १ मे पासून चालक नसल्याने थांबून आहे.
पावसाळा चालू होण्यापूर्वी गावातील अतिरिक्त कचरा व गटारी स्वच्छता करून कचरा गावातून बाहेर काढणे गरजेचे आहे. मात्र, ऐन गरजेच्यावेळी ही सेवा थांबली आहे.
कचरा वेळेत उचलला नाही तर गटारी साचून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. शिवाय गावात स्वच्छता कर्मचारी यांच्याकडून होणारी तात्पुरती उचलही नियमित नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी याकडे त्वरित लक्ष देऊन ही सेवा पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे.