‌‘गोकुळ’ची उत्पादने देशाबाहेर जाण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:03 IST2021-01-13T05:03:32+5:302021-01-13T05:03:32+5:30

करंजफेण : थायलंडचे अर्थ सल्लागार चेतन अरुण नरके यांनी पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसराचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी ...

गरजGokul's products need to go abroad | ‌‘गोकुळ’ची उत्पादने देशाबाहेर जाण्याची गरज

‌‘गोकुळ’ची उत्पादने देशाबाहेर जाण्याची गरज

करंजफेण : थायलंडचे अर्थ सल्लागार चेतन अरुण नरके यांनी पन्हाळा तालुक्यातील बांधारी परिसराचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी निकमवाडी येथील उदय दूध संस्थेच्यावतीने संस्थापक बाजीराव निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोकुळ निवडणुकीच्या पूर्वसंध्येवर संस्था पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा दौरा असल्याचे दिसून आले. यावेळी चेतन नरके म्हणाले की, राजकारण हा मुद्दा बाजूला ठेवून गोकुळ संघाचे आता देशाबाहेरदेखील नाव होणे गरजेचे आहे. इतर दूध संघांनी आपला विस्तार वाढविल्यामुळे त्यांची संकलन क्षमता कोटी लिटरच्या घरात गेली आहे. ‘गोकुळ’ची उत्पादने सध्या देशाबाहेर जाण्याची खरी गरज आहे. संघाचे संकलन क्षमता वाढल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. तसेच उत्पादकांना मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ होईल. नरके साहेबांनी नेहमी उत्पादकांचे हित डोळ्यां समोर ठेवून कार्य केले असून, यापुढील काळात उत्पादकांना जास्तीजास्त फायदा कसा निर्माण करून देता येईल यासाठी नेहमी प्रयत्नशील असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ‘गोकुळ’चे संचालक विश्वास जाधव, तसेच नामदेव पाटील, नाना खोत, शिवाजी निकम, सचिन खोत, विजय निकम, डाॅ. मानसिंग निकम, दादासो माने, आदी उपस्थित होते.

फोटो : निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील उदय दूध संस्थेच्या वतीने थायलंड अर्थ सल्लागार चेतन नरके यांचा बाजीराव निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: गरजGokul's products need to go abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.