साखर कामगार प्रतिनिधींच्यावतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST2021-01-23T04:24:46+5:302021-01-23T04:24:46+5:30
कोल्हापूर येथील वीरशैव बँकेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्त उद्योग समूहाच्यावतीने अध्यक्ष गणपतराव ...

साखर कामगार प्रतिनिधींच्यावतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार
कोल्हापूर येथील वीरशैव बँकेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. शिरोळ येथे दत्त कारखाना कार्यस्थळावर दत्त उद्योग समूहाच्यावतीने अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. बँकेवर असलेल्या सभासदांचा विश्वास यामुळेच निवडणूक बिनविरोध झाली. त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासोा काळे, कार्याध्यक्ष राऊसोा पाटील, रावसाहेब भोसले, बाळासाहेब बनगे, सर्जेराव हळदकर, आझाद शेख, धोंडीराम दबडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २२०१२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ -
शिरोळ येथे ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तात्यासोा काळे, राऊसोा पाटील, रावसाहेब भोसले, बाळासाहेब बनगे, सर्जेराव हळदकर, आझाद शेख उपस्थित होते.