आजरा तालुक्यात गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:02+5:302021-09-21T04:27:02+5:30
तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरणात गेले दहा दिवस गणपतीची पूजा-अर्चा करण्यात आली. कोरोनामुळे अन्य सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. त्यातच ...

आजरा तालुक्यात गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत
तालुक्यात सर्वत्र भक्तिमय वातावरणात गेले दहा दिवस गणपतीची पूजा-अर्चा करण्यात आली. कोरोनामुळे अन्य सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आला. त्यातच पावसानेही व्यत्यय आणल्यामुळे झिम्मा फुगडी व गौरी गणपतींच्या कार्यक्रमांवर निर्बंध आले. रवळनाथ मंदिर येथील सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी पालखीतून नेण्यात आला. यावेळी आजऱ्यात नव्याने सुरू झालेल्या नाशिक ढोलचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आजरा शहरातील सर्वच मंडळांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. खोराटवाडी व गवसे येथे सर्वांनी वेगवेगळ्या रंगांचे फेटे बांधून टाळ-मृदुंगाचा गजर करीत मिरवणूक काढली. भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हरुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वांनीच ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत गणरायाला निरोप दिला. त्यामुळे सर्वत्र शांततेत गणपतीचे विसर्जन करण्यात आले.