शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 18:38 IST

यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी पुढाकारसहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जनही पर्यावरणपूरक करण्यासाठी नियोजन

कोल्हापूर: यंदाच्या वर्षी घरगुती गणपतींचे शंभर टक्के पर्यावरणपूरक विसर्जन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर कोरोनाचे संकट असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करावे लागत आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात येत आहे.

गुरुवारी (दि. २७) घरगुती गणपती विसर्जनावेळी १६० ठिकाणी पर्यावरण विसर्जन कुंडे ठेवली जाणार आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाप्रमाणेच पर्यावरणपूरक विसर्जन कुंडांमध्ये मूर्ती विसर्जित करा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोनाविषयी नागरिकांमध्ये असलेले गांभीर्य आणि महापालिकेने केलेले चांगले नियोजन यांमुळेच दीड दिवसाचे गणेशमूर्ती विसर्जन पर्यावरणपूरक करण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा प्रथमच मोठ्या संख्येने म्हणजेच दीड दिवसाच्या ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले.

गुरुवारी सहा दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन आहे. यासाठीही महापालिकेने चोख नियोजन केले आहे. विसर्जन कुंड येथे संकलित होणाऱ्या मूर्ती कोणताही धक्का न लागता टेम्पो आणि ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने इराणी खण येथे विसर्जित केल्या जाणार आहेत.रंकाळा, पंचगंगा परिसरात १२ विसर्जन कुंडेमहापालिका प्रशासनाच्या वतीने रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातली असली तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ८१ प्रभागांत १६० विसर्जन कुंडांसह रंकाळा आणि पंचगंगा येथे १२ पर्यावरणपूरक विसर्जन कुंडे ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रंकाळा तलाव परिसरात सहा, पंचगंगा नदीघाट परिसरात सहा कुंड आहेत.रंकाळा, पंचगंगा परिसरातील कुंडरंकाळा चौपाटी परिसर, संध्यामठ, राजे संभाजी तरुण मंडळ, तांबट कमान परिसर, पदपथ उद्यान, पतोडी खण, पंचगंगा घाट परिसर, जामदार क्लबसमोर, तोरस्कर चौक.विसर्जन कुंडाभोवती गर्दी करू नकामहापालिका गुरुवारी सकाळी आठ वाजता प्रत्येक प्रभागात पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची सोय करणार आहे. त्यामुळे सायंकाळी चारनंतर एकाच वेळी घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी बाहेर पडू नये. गर्दी टाळण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीने विसर्जनासाठी बाहेर पडावे, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवkolhapurकोल्हापूरenvironmentपर्यावरण