शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival -शहरात ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 15:51 IST

दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.

ठळक मुद्देशहरात ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जनदीड दिवसाचा गणपती विसर्जनची संख्या वाढली

कोल्हापूर : दीड दिवसाच्या गणपतीचे रविवारी विसर्जन करण्यात आले. यामध्ये शहरातील ३८६ गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. यामध्ये दोन मंडळांचा समावेश आहे. महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंड येथील संकलित झालेल्या मूर्ती इराणी खणीमध्ये विसर्जित करण्यात आल्या.गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली. रविवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. महापालिकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी, रंकाळा तलाव तसेच इतर तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घातली आहे.

यासाठी दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी २४ ठिकाणी ३० पर्यावरणपूरक विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. येथे मूर्ती विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या वतीने ट्रॅक्टर, टेम्पोमधून विसर्जन कुंड येथील मूर्ती इराणी खाण येथे विसर्जित करण्यात आल्या. यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागासह चारीही विभागीय कार्यालयांतील २५० कर्मचारी नियुक्त केले होते.मूर्तिदानला चांगला प्रतिसादकोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने प्रभागांमध्ये पर्यावरणपूरक विसर्जन कुंडाची सोय केली. या कुंडामध्ये विसर्जनासाठी यंदाच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला. गतवर्षी दीड दिवसाच्या केवळ ६० गणपती मूर्तींचे दान करण्यात आले होते. यावेळी ३८६ मूर्ती दान झाल्या आहेत. तसेच गतवर्षीच्या तुलनेत दीड दिवसाने मूर्ती विसर्जन करण्याचे प्रमाण काही अंशी वाढल्याचे दिसून आले.पंचगंगा नदीसह तलाव सीलसोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी महापालिकेने पंचगंगा नदी, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव येथील परिसर बॅरिकेड‌्स लावून सील केले.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर