गणपती आगमन फोटो ओळ फाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST2021-09-11T04:24:51+5:302021-09-11T04:24:51+5:30

-- ०२ गणपती म्हणजे बच्चे कंपनीचा लाडका देव. या देवाला लहान मुलांनी वाजत-गाजत हातगाडीवरून ‘मोरया’चा गजर करत नेले. --- ...

Ganpati arrival photo line file | गणपती आगमन फोटो ओळ फाईल

गणपती आगमन फोटो ओळ फाईल

--

०२

गणपती म्हणजे बच्चे कंपनीचा लाडका देव. या देवाला लहान मुलांनी वाजत-गाजत हातगाडीवरून ‘मोरया’चा गजर करत नेले.

---

०३

मुलींनी गणेशमूर्ती नेण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. बाप्पांसोबत सेल्फी घेऊन महिलांनी हा आनंद कॅमेऱ्यात कैद केला.

--

०४

कोल्हापुरातील गंगावेश येथून मोठया संख्येने भाविकांनी गणेशमूर्ती नेल्या.

--

०५

पेशवाई टोपी घालून आलेल्या लहानग्याने देवाची मूर्ती बघताच हात जोडले.

०६, ०७,०८,०९

महिलांकडून सारथ्य

देवाची मूर्ती पुरुषांनीच घ्यायची, या पारंपरिक विचारसरणीला छेद देत गेल्या काही वर्षांपासून मुली व महिलांनी बाप्पांचे सारथ्य केले आहे. गंगावेश येथून गणेशमूर्ती नेताना महिला.

---

१०

गणेशमूर्ती सहकुटुंब नेताना सेल्फी विथ बाप्पा.

---

११

अनेक भाविकांनी दुचाकीवरून गणेशमूर्ती नेली.

--

१२

देवाला पाऊस लागू नये म्हणून छत्री धरलेला भाविक.

-

१५

बच्चे कंपनीसोबत चारचाकीतून घरी जाताना बाप्पांचा थाटच न्यारा.

--

१६

भागा-भागातील नागरिकांनी हातगाडीवरून एकत्रितरित्या गणेशमूर्ती नेल्या.

--

१७

गणेशमूर्ती अगदी जवळून न्याहाळताना चिमुकली.

--

१८

‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत अनेक भाविकांनी डोक्यावरून गणेशमूर्ती नेली.

--

१९

भाविकांच्या सुरक्षेसाठी ऐन सणातही ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी भाविकांच्या आनंदातच आनंद मानत देवाला नमस्कार केला.

---

सर्व छाया : नसीर अत्तार

--

Web Title: Ganpati arrival photo line file

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.