मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:55 IST2020-12-05T04:55:43+5:302020-12-05T04:55:43+5:30
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी सहा संशयित आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी पकडला. त्यांच्याकडून तीस किलो ...

मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीला पकडले
कुरुंदवाड : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील जैन मंदिरातील चोरीप्रकरणी सहा संशयित आरोपींना कुरुंदवाड पोलिसांनी पकडला. त्यांच्याकडून तीस किलो चांदी, २७ ग्रॅम सोने व मोटारसायकल असा १३ लाख ५१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी रामा अशोक कोरवी (वय २५), संदीप रवींद्र जामदार (४०), अनिल बाबासोा चौगुले (३८, सर्व रा. इचलकरंजी) दीपक रामू दमाने (४३, रा. कबनूर, ता. हातकणंगले), राहुल भास्कर कांबळे (३५, रा. कोंडिग्रे, ता. शिरोळ), शामराव बाळू काळुंगे (५८, रा. मादळमुठी, ता. खानापूर, जि. सांगली) यांना अटक केली आहे. २४ नोव्हेंबरला संशयित रामा कोरवी याला खिद्रापूर येथील जैन मंदिरात चोरी करताना कुरुंदवाड पोलिसांनी रंगेहात पकडले होते. त्याची कसून चौकशी केली असता दोन वर्षांत साथीदारांसोबत शिरोळ तालुक्यातील हेरवाड, बस्तवाड, निमशिरगांव, दानोळी, हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे, मिणचे, किणी, रांगोळी, कबनूर या ठिकाणचे जैन मंदिरातील व कर्नाटकातील एकसंबा येथील जोतिबा मंदिरातील चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचे दागिने शामराव काळुंगे या सोनाराकडे देत असल्याचे स्पष्ट झाले असून त्यालाही अटक केली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. अडसूळ, हवालदार अनिल चव्हाण, अविनाश मुंगसे, शहाजी फोंडे, प्रकाश हंकारे, असिफ शिराजभाई, प्रविण मोहीते यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी, निरीक्षक चंद्रकांत निरावडे उपस्थित होते.
फोटो - ०३१२२०२०-जेएवाय-०५
फोटो ओळ - मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक चंद्रकांत निरावडे उपस्थित होते.