शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

बोगस वाहन परवाना; पुणे व्हाया कोल्हापूर कनेक्शन, ‘एआय’द्वारेही परस्पर परवाने दिल्याची धास्ती

By सचिन यादव | Updated: November 8, 2025 18:57 IST

आरटीओ सक्रिय

सचिन यादवकोल्हापूर : कोणत्याही चाचणीशिवाय कच्चे आणि पक्के वाहन चालविण्याचा परवाना देणारी टोळी पुणे आणि कोल्हापूर विभागात सक्रिय झाली आहे. पुणे (उरळीकांचन) येथेही या प्रकारच्या जाहिरात करून नागरिकांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यात काही सोशल मीडियावरील जाहिराती प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या रडारवर आहेत. बोगस परवान्याचे पुणे, कोल्हापूर कनेक्शन आहे.जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीर शिबिर भरवून वाहन परवाना काढून दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून राज्यभरातील आणखी काही टोळीतील नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींनी ६००हून अधिक जणांना गंडे घातल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस येत आहे.

वाचा: बेकायदेशीर लायसन्स प्रकरणातील आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडीपरवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे, चाचणी टाळून तत्काळ परवाना मिळविण्यासाठी काहींना १९९९ रुपयांत वाहन चालविण्याचा परवान्याची सोशल मीडियावरील जाहिरात पाहिली. त्याच्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधून काहींनी ऑनलाइन पैसे भरले. तर काहींना जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील हॉटेलमध्ये शिबिराच्या ठिकाणी बोलविण्यात आले.

त्यांना आरटीओ कार्यालयात ज्याप्रमाणे रजिस्टरद्वारे नोंदणी केली जाते, त्याप्रमाणे कागदपत्रांची तपासणी करून साधी पावती दिली आहे. तत्काळ परवाना मिळेल, अशा भूलथापांना नागरिक बळी पडले आणि त्यांनी शिबिराच्या संयोजकाला दोन हजार रुपये दिले. प्रामाणिकपणा म्हणून संयोजकांनी त्यांना एक रुपयाही परत देऊन अधिक विश्वास संपादन केला.

प्रादेशिक परिवहन विभागाचे दर

  • शिकाऊ परवाना २०० रुपये
  • कायम परवाना ७९८ रुपये

बोगस शिबिरातील दरपत्रक

  • शिकाऊ परवाना ८०० रुपये
  • कायम परवाना १२०० रुपये

एआयद्वारेही फसवणुकीची भीतीराज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर एआयद्वारे फसवणूक करून कसा परवाना दिला जातो. त्यासाठी हॅकर्स कोणत्या प्रकारची गुन्ह्याची पद्धत वापरतात, याचे सादरीकरण केले. मुंबई आणि पुणे या ठिकाणी अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना घडत असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले.

कोल्हापूर आरटीओ झाले दक्षशिकाऊ परवान्यातील परीक्षेत कोणीही परस्पर बदल करु नये. हॅकर्स सिस्टीमवर ताबा मिळवू नये, यासाठी कॅप्चा कोड अधिक सक्षम केला आहे. अन्य कोणत्याही सर्व्हर ऐवजी परिवहन विभागाच्या यंत्रणेतून शिकाऊ परवाना परीक्षा घेतली जात आहे. त्याबाबतच्या सूचना लर्निंग विभागातील मोटार वाहन निरीक्षकांना दिल्या आहेत.

एआयद्वारे आणि बेकायदेशीर शिबिर भरवून लायसन्स देणाऱ्या टोळीवर प्रादेशिक कार्यालयाची करडी नजर आहे. नागरिकांनीही त्याबाबत सतर्क रहावे. कोणाचीही फसवणूक होऊ नये, म्हणून त्याबाबतचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत. -संजीव भोर, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

पुणे आणि काही परिसरात अशा प्रकाराच्या टोळी कार्यरत असल्याचा संशय आहे. त्याची माहिती संबंधित आरटीओंना दिली जाणार आहे. नागरिकांच्या निदर्शनास असे प्रकार आल्यास तातडीने माहिती कळवावी. -विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, इचलकरंजी

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Driving Licenses: Pune-Kolhapur Connection, AI Fraud Concerns Emerge

Web Summary : A gang issuing fake driving licenses operates in Pune and Kolhapur. They lure people with ads promising licenses without tests for a fee. Authorities warn of AI fraud and urge vigilance against scams. Kolhapur RTO enhances security measures.