शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव साधेपणाने करणाऱ्या तालीम मंडळांचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:23 IST

कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते २८ आॅगस्टला सन्मानपत्र केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : कोल्हापूरवर ओढवलेल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणाऱ्या सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांचा सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दिली.

शहरातील मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार, राजारामपुरी, संभाजीनगर परिसरातील सुमारे ३०० गणेश मंडळे, तालीम संस्थांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच उत्सवाचा डामडौल, सजावट, देखावे रद्द करून जमा झालेला सगळा निधी पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी दिला जाणार आहे.

या निर्णयाचा कौतुक सोहळा म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने २८ आॅगस्टला केशवराव भोसले नाट्यगृहात गणराया अ‍ॅवार्डचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मंडळ, तालीम संस्थांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते सन्मानपत्र देवून गौरव करण्यात येणार आहे.कार्यक्रमास महापौर माधवी गवंडी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आदी उपस्थित राहणार आहेत.गणेशोत्सव २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे; त्यासाठी कोल्हापूरकरांची तयारी सुरू असताना महापुराने थैमान घातले. गावे, घरे, जनावरे, आयुष्यभराची जमापुंजी, संसार सगळे काही नद्यांनी आपल्या कवेत घेतले. ओसरत असलेल्या पुराने नागरिकांच्या डोळ्यांत मात्र अश्रूंचा महापूर आणला आहे.

अस्मानी संकटात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, जुना बुधवार पेठ, राजारामपुरी, संभाजीनगरसह उपनगरातील ३०० पेक्षा जास्त तरुण मंडळे, तालीम संस्थांनी एकमताने यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने करून जमा झालेला वर्गणीचा पैसा पूरग्रस्तांना घरे बांधण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आहे.

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिसKolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर