शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव, चेन स्नॅचरचे वाढते प्रमाण : ३५० हून अधिक पोलीस रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:43 IST

गणेशोत्सव आणि वाढते चेन स्नॅचरचे प्रमाण यांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी संपूर्ण कोल्हापूर शहरात चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी केली.

ठळक मुद्देगणेशोत्सव, चेन स्नॅचरचे वाढते प्रमाण : ३५० हून अधिक पोलीस रस्त्यावरनाकाबंदी करून शहरात वाहनांची कसून तपासणी

कोल्हापूर : गणेशोत्सव आणि वाढते चेन स्नॅचरचे प्रमाण यांमुळे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार बुधवारी सकाळी संपूर्ण कोल्हापूर शहरात चारही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अचानक नाकाबंदी करून वाहने तपासणी केली. सुमारे ३५० हून अधिक पोलीस कर्मचारी रस्त्यांवर तपासणीसाठी उतरले होते. या नाकाबंदीमुळे अनेक वाहनधारकांची तारांबळ उडाली.गेल्या पाच महिन्यांत पोलीस यंत्रणा कोरोना संकटावर मात करण्यासाठी बंदोबस्तात अडकली आहे, याचाच फायदा घेऊन गेल्या दोन महिन्यांत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांचे दागिने भरधाव दुचाकीवरून चोरट्याकडून हिसकावून नेण्याचे प्रमाण वाढत आहे.

त्यांना पकडणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. त्यातच गणेशोत्सव बंदोबस्तातही पोलीस यंत्रणा गुंतली आहे. त्यामुळे चेन स्नॅचरसह अनेक गुन्हेगारांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर तसेच गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी या उद्देशाने बुधवारी अचानक संपूर्ण शहरात सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत चौका-चौकांत पोलिसांनी बॅरिकेड‌्स लावून वाहनांची कसून तपासणी केली.जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, लक्ष्मीपुरीचे अनिल गुजर, शाहूपुरीचे श्रीकृष्ण कटकधोंड, राजारामपुरीचे विकास डुबल, शहर वाहतूक शाखेचे वसंत बाबर यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी असे सुमारे ३५० हून अधिकजण रस्त्यांवर उतरले.

नाकाबंदीमध्ये शहरात प्रवेशणाऱ्या मार्गावर तसेच प्रमुख चौका-चौकांत, वर्दळीच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवून वाहनांची कसून तपासणी केली. वाहनांची कागदपत्रे, लायसेन्स, आदी तपासणी नाकाबंदीमध्ये केली. नंबरप्लेट नसलेल्या वाहनांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले. 

 

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर