गणेशमूर्तींनी स्टॉल सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:29 IST2021-09-04T04:29:51+5:302021-09-04T04:29:51+5:30

कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे १३ दिवस राहिल्याने शहरातील कुंभारवाड्यात व उपनगरांमध्ये गणेशमूर्तीचे स्टॉल सजले आहेत. सिंहासन, ...

Ganesha idols decorated the stalls | गणेशमूर्तींनी स्टॉल सजले

गणेशमूर्तींनी स्टॉल सजले

कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे १३ दिवस राहिल्याने शहरातील कुंभारवाड्यात व उपनगरांमध्ये गणेशमूर्तीचे स्टॉल सजले आहेत. सिंहासन, उंदरावर बसलेला, जास्वंदीचे फूल, कोल्हापुरी फेटा, धोतर अशा वेगवेगळ्या रूपातील आकर्षक गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दुसरीकडे कुंभारवाड्यातील घराघरांत अन्य गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. यंदा महापुराने गणेशमूर्तींचे नुकसान झाले असले तरी कोल्हापूरकरांची गरज भागेल एवढ्या मूर्ती कुंभारांनी तयार केल्या आहेत. या तयार मूर्तींचे बुकिंग आता सुरू झाले आहे. शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, बापट कॅम्प येथील कुंभारवाड्यांमधील घरांबाहेर आता गणेशमूर्ती मांडले आहेत. दिवसभरात नागरिक मूर्तीची निवड करून त्याचे बुकिंग करून जात आहेत. याशिवाय पाचगाव, संभाजीनगर, कळंबा, आर. के. नगर, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत या उपनगरांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती बुकिंगसाठी मांडण्यात आले आहेत. सलग दोन वर्षे कोरोना आणि महापूर अशा संकटांमुळे काही प्रमाणात गणेशमूर्तींचे दर वाढले आहेत.

--

कुंभारांकडील मूर्तींची एकदम खरेदी

उपनगरांमध्ये कुंभार समाज फार नसला तरी तेथील नागरिकांच्या सोयीसाठी गणेशमूर्ती उपलब्ध होतात. येथील व्यावसायिक कुंभारांकडून घाऊक रकमेत गणेशमूर्ती विकत घेतात आणि नागरिकांना विकतात. कुंभारांचे वर्ष गणेशमूर्ती बनवण्यात जाते. परत त्यांची विक्री करत बसण्याऐवजी एकदमच मूर्ती दिल्या जातात त्यामुळे कुंभार, विक्रेते आणि नागरिक यांनाही सोयीस्कर होते.

---

कुंभारवाड्यात लगबग

एकीकडे मूर्तींचे बुकिंग दुसरीकडे रंगकाम शिल्लक राहिलेल्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवणे या कामात सध्या कुंभार बांधव व्यस्त आहेत. कोणी रंगकाम करतंय, कोण डोळे रेखाटतंय, कोण बुकिंग करतंय, कोण सोंड रंगवतंय.. असे अख्खे कुटुंब भाविकांचा देव घडवण्यात गुंतले आहेत.

--

फोटो नं ०३०९२०२१-काेल-गणेशमूर्ती

ओळ : गणेशोत्सवाला अवघे सात दिवस राहिल्याने कोल्हापुरातील मुख्य रस्त्यालगत आकर्षक गणेशमूर्तींचे स्टॉल सजले आहे. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Ganesha idols decorated the stalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.