शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर आवाज बंद म्हणजे बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 15:13 IST

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही रात्री बारानंतर मंडळांचा आवाज बंदच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट ...

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदाही रात्री बारानंतर मंडळांचा आवाज बंदच राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले. बिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश या मार्गावर रात्री आठ ते ११ या वेळेत प्रचंड गर्दी असते. ही गर्दी टाळण्यासाठी मार्गावर ठिकठिकाणी 'एक्झिट वे' तयार करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. पंडित यांच्यासह अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. १०) दुपारी मिरवणूक मार्गाची पाहणी करून गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या.गणेश आगमन मिरवणुकीत रात्री बाराला ध्वनियंत्रणा बंद करून वेळेत मिरवणूक आटोपण्याचे काम पोलिसांनी केले. हाच नियम विसर्जन मिरवणुकीतही कायम राहणार असल्याचे पोलिस अधीक्षक पंडित यांनी स्पष्ट केले. तसेच मिरवणूक मार्गावर ठाण मांडून मागील मंडळांना अडथळा करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अधीक्षक पंडित यांच्यासह शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके आणि शहरातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांनी मंगळवारी मिरवणूक मार्गाची पाहणी केली. विशेषत: मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी, गंगावेश या मार्गाची पाहणी केली. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना बाहेर पडण्यासाठी 'एक्झिट वे' तयार करण्याच्या सूचना अधीक्षकांनी दिल्या. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सहा ठिकाणी सुरक्षा मनोरे उभारले जाणार आहेत. मार्गावर येणा-या आणि जाणा-या नागरिकांना दोन्ही बाजूने स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. मिरवणूक मार्गालगत फेरीवाले आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना थांबण्याची परवानगी दिली जाणार नाही, अशी माहिती अधीक्षकांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024