पडळ ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गणेश पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:29 IST2021-08-25T04:29:50+5:302021-08-25T04:29:50+5:30

कासारी नदीला आलेल्या महापुराच्या काळात गावचा पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नदीच्या पुराच्या पाण्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता ...

Ganesh Patil felicitated on behalf of Padal Gram Panchayat Administration | पडळ ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गणेश पाटील यांचा सत्कार

पडळ ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने गणेश पाटील यांचा सत्कार

कासारी नदीला आलेल्या महापुराच्या काळात गावचा पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नदीच्या पुराच्या पाण्यात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता योगदान दिलेल्या दिंगबर शिंदे, अभिजीत पाटील, बळवंत कदम, सागर पवार, बळी नांगरे, प्रताप मोहिते, नामदेव कुंभार, प्रल्हाद कुंभार, स्वप्निल कदम, प्रल्हाद अतिग्रे यांचाही यानिमित्ताने ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त गणेश पाटील यांनी केंद्रशाळेतील गरीब विद्यार्थ्यांना वह्यावाटप केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विष्णू चौगले, ग्रामविकास अधिकारी अंकुश शेलार, पोलीस पाटील अभिनंदन पोवार, तंटामुक्ती अध्यक्ष पोपट निकम, संजय सोळशे, सुनील चोपडे, संजय कदम, प्रवीण शिंदे, आनंदा कांबळे, भैरू कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Ganesh Patil felicitated on behalf of Padal Gram Panchayat Administration