गांधीनगर सरपंचांनी ग्रा.पं. सदस्यांची बदनामी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:53+5:302021-07-19T04:16:53+5:30
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रितू लालवाणी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केला. वेळोवेळी ...

गांधीनगर सरपंचांनी ग्रा.पं. सदस्यांची बदनामी थांबवा
यावेळी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रितू लालवाणी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात न घेता कारभार केला. वेळोवेळी खोटे प्रोसिडिंग तयार केले. बेकायदेशीर बांधकामांना अभय दिले. त्यांच्यामुळेच गांधीनगरमध्ये अतिक्रमणाचे जंगल उभे राहिले आहे. त्यांच्याभोवती लँडमाफियांची टोळी कार्यरत राहिली. ग्रामपंचायत सदस्यांना त्यांनी कधीही माहिती दिली नाही. त्यांनी दिव्यांग वैद्यकीय प्रमाणपत्र काढून राज्य आणि केंद्र शासनाची फसवणूक केली आहे. अशा प्रवृत्तीच्या रितू लालवाणी यांना सरपंच पदावर राहण्याचा नैतिक अधिकारी नाही. त्यामुळेच पुणे आयुक्तांनी त्यांचे पद रद्द केले आहे. त्यांनी इतर सदस्यांवर चिखलफेक करणे थांबवावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला.