तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ गांधीनगर पोलिसांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST2021-06-23T04:16:56+5:302021-06-23T04:16:56+5:30
गांधीनगर बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोना महामारी संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत असल्याने आर. आर. पाटील हे तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ आले. ...

तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ गांधीनगर पोलिसांची नाकाबंदी
गांधीनगर बाजारपेठेत होणारी गर्दी कोरोना महामारी संसर्गाला आमंत्रण देणारी ठरत असल्याने आर. आर. पाटील हे तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ आले. त्यांनी जे लोक विनाकारण फिरत असतील, अशांवर कारवाई करण्याच्या सूचना गांधीनगर पोलिसांना दिल्या. विनाकारण फिरणाऱ्या लोकांनासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सरसकट नागरिकांना अडवण्यात आले. त्यातच खते व बी-बियाणे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनाही रोखण्यात आले. त्यांना विनाकारण थांबवून ठेवण्यात आले. दरम्यान, गांधीनगर शासकीय उपजिल्हा वसाहत रुग्णालयांमध्ये लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनाही तावडे हॉटेलनजीक उड्डाणपुलाजवळ अडवण्यात आले. शासकीय वसाहत रुग्णालयामध्ये लस घेण्यासाठी गांधीनगर परिसरासह जिल्ह्यातून नागरिक येत असतात. पण त्यांना अडवून ठेवण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील काही घटकांनाही असाच कटू अनुभव आला. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे; पण, शेतकऱ्यांना, लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना का अडवण्यात आले, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
फोटो : २२ गांधीनगर कारवाई
गांधीनगर पोलिसाकडून तावडे हॉटेल उड्डाणपुलाजवळ नाहक फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली. त्याचा फटका मात्र अत्यावश्यक सेवा बजावणारे व शेतकऱ्यांनाही बसला.