गांधीनगरात मजुराचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:27 IST2021-09-26T04:27:27+5:302021-09-26T04:27:27+5:30

गांधीनगर येथील श्रीचंद नेरूमल मोटवानी यांचे बरॅक नंबर ४३ / ४ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर गवंडी ...

In Gandhinagar, a laborer fell into a water tank and died | गांधीनगरात मजुराचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

गांधीनगरात मजुराचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू

गांधीनगर येथील श्रीचंद नेरूमल मोटवानी यांचे बरॅक नंबर ४३ / ४ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामावर गवंडी म्हणून यमनाप्पा बाली हा काम करत होता. शनिवारी सकाळी तो नवीन बांधकामावर पाणी मारण्याचे काम त्यांनी सुरू केले. दरम्यान, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तो पाण्याच्या टाकीत पडला. काही वेळाने ही घटना सोबत काम करणाऱ्या कामगाराने पाहिली. त्यांनी बांधकाम मालकास आणि कंत्राटदारास कळवली. त्यानंतर त्याला उपचारासाठी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली. याबाबतची फिर्याद बांधकाम मालक श्रीचंद नेहरूमल मोटवानी यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुदर्शनी करत आहेत.

मयत : २५ यमनाप्पा बाली

Web Title: In Gandhinagar, a laborer fell into a water tank and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.