ऑनलाइन लॅपटॉप खरेदीत गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:23 IST2021-01-21T04:23:52+5:302021-01-21T04:23:52+5:30
इचलकरंजी : ऑनलाइन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी पैसे देऊनही लॅपटॉप न मिळाल्याने फसवणूक झाल्याची तक्रार एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली ...

ऑनलाइन लॅपटॉप खरेदीत गंडा
इचलकरंजी : ऑनलाइन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी पैसे देऊनही लॅपटॉप न मिळाल्याने फसवणूक झाल्याची तक्रार एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. जुबेर फिरोज शेख (वय २१, रा. स्वामी मळा, इचलकरंजी) असे तक्रारदाराचे नाव असून, या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अभिषेक भूपेंद्र कावटकर (रा. मुंबई), सोनू आनंद मिश्रा (रा. कोलकाता) व सिंग (पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जुबेर यांनी ऑनलाइन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी वरील संशयितांना वेळोवेळी पैसे दिले. त्यांनी त्याच्या खोट्या पावत्या व्हॉट्सॲपवर पाठवून दिल्या. परंतु, जुबेर यांना लॅपटॉप मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार दिली.