गणपतराव देशमुखांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्य वेचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:27 IST2021-08-19T04:27:23+5:302021-08-19T04:27:23+5:30

दुर्गमानवाड : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य व कष्टकरी लोकांसाठी वेचले ...

Ganapatrao Deshmukh sacrificed his life for the common man | गणपतराव देशमुखांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्य वेचले

गणपतराव देशमुखांनी सर्वसामान्यांसाठी आयुष्य वेचले

दुर्गमानवाड : शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य व कष्टकरी लोकांसाठी वेचले असून, त्यांच्या कार्याचा ठसा तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शेकापचे राज्य सदस्य व भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील यांनी केले.

राधानगरी तालुका शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने सांगोला (जिल्हा सोलापूर) येथील माजी आमदार गणपतराव देशमुख यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी महादेवराव कोथळकर (गुडाळ), अंबाजी पाटील (येळवडे), संजय डकरे (राशिवडे बुद्रुक), शिवाजी वाघुर्डेकर (शिरगाव), विष्णुपंत एकशिंगे, सरपंच (वाघवडे), शिवाजी सावंत (खिंडी व्हरवडे), मधुकर पाटील (पुंगाव), आनंदराव पाटील, दौलत कांबळे (आम. व्हरवडे) ,रामचंद्र कौलवकर (कंथेवाडी), भगवान पाटील (मोहडे) उपस्थित होते.

फोटो : १८ दुर्गमानवाड आदरांजली

गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेस एकनाथ पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी महादेवराव कोथळकर, अंबाजी पाटील उपस्थित होते.

Web Title: Ganapatrao Deshmukh sacrificed his life for the common man