शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

चमत्काराचे ‘खेळ’ आता विधानपरिषदेत

By admin | Updated: November 17, 2015 00:45 IST

जिल्ह्याचे राजकारण : कोल्हापूर महापालिकेच्या यशामुळे सतेज-मुश्रीफ-कोरे गट्टीचा दबदबा वाढला

विश्वास पाटील --कोल्हापूर --महापालिकेची ही निवडणूक असली तरी तेथील जय-पराजयाशी व संख्याबळाशी विधानपरिषदेचे राजकारण जोडले आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना विधानपरिषद मतदारसंघातील विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तेला आव्हान द्यायचे होते. त्यासाठी महापालिकेतील सत्तेवर काँग्रेसचे वर्चस्व हवे होते. महाडिक यांनीही ‘ताराराणी’चा स्वतंत्र तंबू उभा केला, भाजपला सोबत घेतले, त्यामागेही आपली हुकमी मते हवीत असेच राजकारण होते. मावळत्या सभागृहात महाडिक यांना मानणारे नगरसेवक होते; परंतु ते पक्षाच्या चिन्हांवर निवडून आलेले होते व अशा सदस्यांना पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. ही अडचण ओळखून महाडिक यांनी ‘ताराराणी’ आघाडीच्या चिन्हावर आपली माणसे निवडून आणली. महापालिकेतील सत्ता हे भाजपचे म्हणजेच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे साध्य होते; परंतु महाडिक यांचे हे विधानपरिषदेची निवडणूक जिंकण्याचे साधन होते. म्हणूनच त्यांनी ज्या राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढविली त्याच पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी ताराराणीच्या १९ नगरसेवकांची फौज विनाशर्त द्यायचे निकालादिवशीच जाहीर करून टाकले. तसा प्रस्तावही त्यांनी आमदार मुश्रीफ यांना स्वत:हून दिला होता. त्यामागेही विधानपरिषदेच्या संख्याबळाचेच गणित होते. कारण आता महाडिक यांचा हात चंद्रकांतदादांनी हातात घेतला आहे. त्यामुळे दादा काय कुठे जात नाहीत; परंतु मुश्रीफ जसे ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या हाताला लागले नाहीत, तसे ते विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांच्या हाताला लागू नयेत, असा हा डाव होता; परंतु तसे घडले नाही. भाजपला पुढे करून महाडिक यांनी काही खेळी खेळल्या. त्यात राष्ट्रवादीची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा पर्याय चाचपून पाहिला. खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेतृत्वाची राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीशी युती व त्यास भाजपचा बाहेरून पाठिंबा अशी मोट बांधण्यात हरकत नव्हती. कारण त्यामुळे वारंवार भ्रष्टाचारी म्हणून हिणवणाऱ्या पक्षाच्या तुम्ही खांद्यावर हात टाकून कसे सत्तेत बसला, असे भाजपला पुढील चार वर्षे विचारण्याची संधी राष्ट्रवादीला आयतीच मिळाली असती; परंतु आमदार मुश्रीफ यांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही. त्याची कारणे दोन. एक तर त्यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील यांना पाठबळ द्यायचे, हे आधीच ठरवून टाकले आहे. दुसरे असे की, महाडिक व भाजपला पाठिंबा दिला असता तर राष्ट्रवादीची शहराच्या राजकारणात पीछेहाट झाली असती. जिल्हा बँक, बाजार समिती व आता महापालिकेत सतेज-मुश्रीफ-कोरे अशी गट्टी झाली. फक्त ‘गोकुळ’चा अपवाद होता. तिथेही हे तिघे एकत्र असते तर आज जिल्ह्याचे राजकारण वेगळे दिसले असते. आता विधानपरिषदेतही हे तिघेही एकत्रच राहणार हा महापालिका निकालाचा अर्थ आहे.भाजपने म्हणजेच मुख्यत: चंद्रकांतदादा पाटील यांनी ही निवडणूक फारच प्रतिष्ठेची केली. दादांची राजकारणात एक चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे त्यांनी निकालानंतर आम्ही प्रबळ विरोधी पक्षाचे काम करू, अशी जाहीर भूमिका घेतली; परंतु लगेच त्याला छेद देऊन ‘चमत्त्कारा’ची भाषा केली. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने भाजपचा महापौर होऊ दे म्हणजे विकास होईल, असाही मुलामा त्यांनी देऊन बघितला; परंतु तरीही त्यांच्या हाताला कोणतेही अध्यात्म लागले नाही व राष्ट्रवादीही. भाजप व शिवसेना हे पारंपरिक मित्र; परंतु या निवडणुकीत ते शत्रूप्रमाणे लढले. भाजप व ताराराणी आघाडी हे तीस जागांच्या पुढे गेले व शिवसेनेला दहापर्यंत जागा मिळाल्यास हे तिघेच एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करणार हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झाले होते. ती कुणकुण लागल्याने मुख्यत: काँग्रेसने शेवटच्या दोन दिवसांत सगळी ताकद लावून जास्त जागा जिंकून दाखविल्या. त्यामुळेच काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली. निकाल लागल्यापासूनच भाजपने शिवसेनेला ती आपल्या सोबतच असल्यासारखे गृहित धरले. हे दोन पक्ष राज्यात व केंद्रात सत्तेत असूनही त्यांच्यात कमालीचा दु:स्वास आहे. कोल्हापुरात शिवसेनेला चारच जागा मिळाल्या होत्या. त्यांनी पाठिंबा देऊनही भाजपचा महापौर होत नव्हता. त्यामुळे जर तुमचा महापौर होणार असेल, तर मदत करतो; परंतु तसे होणार नसेल, तर मग आम्ही रक्तात पडून का जखमी व्हायचे, असा विचार शिवसेनेने केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने पाठिंबा दिला म्हणून शिवसेनेची सत्ता आली; परंतु तरीही भाजपने निर्णय घ्यायचा व शिवसेनेने तुमच्या मागून फरफटत जायचे, असे आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही कोल्हापुरात तटस्थ राहून शिवसेनेने भाजपच्या राज्य नेतृत्वाला दिला. हे सगळे रामायण घडल्यानंतर आता महापालिकेची सत्ता दोन्ही काँग्रेसकडे गेली आहे. व ज्यांच्याकडून विकास करून घ्यायचा तिथे विरोधी पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कसरत सगळ््यांचीच होणार आहे. मूळची महापालिकेसमोरील आव्हाने खूप मोठी आहेत. त्यात ही कसरत करताना शहराच्या विकासाचा बट्याबोळ होऊ नये एवढीच अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या अश्विनी रामाणे व राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला विजयी झाल्या. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चमत्काराची भाषा केली; परंतु त्यांना भाजपचा महापौर करता आला नाही. या निवडीने माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची विधानपरिषद निवडणुकीतील दावेदारी आणखी भक्कम केली. सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ व जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे हे एकत्र राहणार यावर देखील शिक्कामोर्तब झाले असले तरी खरी झुंज विधानपरिषदेच्या लढतीतच असणार आहे. शिवसेनेने तटस्थ राहून भाजपला आम्हाला फार काळ गृहित धरू नका, असा इशारा दिला.