शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बावड्याच्या ‘खिंडी’त जिवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:32 IST

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. मात्र, पंचगंगा नदीपासून शंभर फुटी असलेला हा रस्ता कसबा बावड्यात प्रवेश करताना ६० फुटीच आहे. त्यात अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अवघा ४० फुटीच रस्ता वापरात येतो. यामुळे या मार्गांवर ...

रमेश पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. मात्र, पंचगंगा नदीपासून शंभर फुटी असलेला हा रस्ता कसबा बावड्यात प्रवेश करताना ६० फुटीच आहे. त्यात अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे अवघा ४० फुटीच रस्ता वापरात येतो. यामुळे या मार्गांवर वाहतुकीची नेहमीच कोंडी होत आहे. जीव मुठीत धरून कासवगतीने येथे वाहने चालवावी लागतात.कसबा बावडा-कोल्हापूर रोडवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामध्ये औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांची दुचाकी वाहने, डंपर, केएमटी बसेस, राष्टÑीय महामार्गावरून येणारी प्रवासी वाहने तसेच गळीत हंगामावेळी उसाच्या बैलगाड्या व ट्रक-ट्रॅक्टर, आदी वाहनांचा समावेश असतो. याशिवाय या मार्गावरच पोलीस मुख्यालय, मुख्य पोस्ट आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायसंकुल, शैक्षणिक संकुल, वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विक्रीकर भवन, जिल्हा प्रशासकीय कार्यालय, अनेक शाळा, महाविद्यालये, आदी असल्याने जाण्या-येण्यासाठी त्याचा प्रामुख्याने वापर होतो. सकाळी १० ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळेत तर प्रचंड गर्दी होते. यावेळेत लहान-मोठे अपघात झाले आहेत.रस्त्यावरील वाढती रहदारी कमी व्हावी तसेच अवजड वाहने येऊ नयेत म्हणून खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावड्यातील श्रीराम पेट्रोल पंप असा पाच कि.मी.चा पंचगंगा नदीकाठावरून शंभरफुटी रस्ता मंजूर झाला. त्यानंतर काही दिवसांत त्याचे कामही सुरू झाले. नंतर मात्र ते बंद पडले. मनपाने हे काम संबंधितांकडून वेळेत पूर्ण करून घेतले तर बावडा मार्गावरील बरीच वाहतूक कमी होईल. बावडा-कोल्हापूर या मार्गावर जशी बावड्यात विविध कारणांनी वाहतुकीची कोंडी होते तशीच कोंडी या मार्गावरील सीपीआर चौक ते शिवाजी पुतळा या प्रचंड वर्दळीच्या मार्गावरही होते. काही वाहनधारक गाडीवर बसूनच रस्त्यावरील भाजी व फळे खरेदी करतात. विक्रेतेही टोपली रस्त्यावर मांडतात. मराठा बॅँक कॉर्नर, शिवाजी रोड, पापाची तिकटी व भवानी मंडपातून येणाºया प्रचंड वाहनांमुळे दिवसभर हा रस्ता गर्दीत हरवलेला असतो. कसबा बावड्यात विविध सणांवेळी मुख्य रस्त्यावर पाण्याचा हौद चौकात फळ व फुले विक्रेते, पूजेचे साहित्य विक्रेते बाजार भरवितात. त्यामुळे या ठिकाणी सणाच्या पूर्वसंध्येला खूपच गर्दी होते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. हा बाजार भाजी मार्केटमध्ये भरविणे गरजेचे आहे.बावडा मेनरोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांचे पार्किंगशंभर फुटी रस्त्यावरून सुसाट येणारी वाहने नियंत्रित न होणेबावड्यातील प्रत्येक गल्लीच्या तोंडाला स्पीड ब्रेकर नसणेबावड्यातील मुख्य रस्त्यावर पुढे स्पीड ब्रेकर आहे असे फलक नसणेसीपीआर चौक ते शिवाजी पुतळा रस्त्यावर दोन्ही बाजूला प्रचंड पार्किंग केलेली वाहनेभाजी विक्रेते व फेरीवाल्यांच्या गाड्यांचा अडथळागळीत हंगामात बावडा मेनरोडवर पाण्याचा हौद चौकात सायं. ५ ते ८ या वेळेत वाहतूक पोलीस नेमणे .बावडा रिंगरोडचे काम त्वरित करणेशिये टोलनाका रोडवरील विद्युत दिवे रात्रीच्यावेळी लावणे 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस