जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटक

By Admin | Updated: July 27, 2014 01:06 IST2014-07-27T00:57:35+5:302014-07-27T01:06:36+5:30

एक लाखाचा मुद्देमाल जप्त : इचलकरंजीत सांस्कृतिक संस्थेच्या नावावर जुगार

Gambling raid; 21 people arrested | जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटक

जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना अटक

इचलकरंजी : येथील गावभाग पोलिसांनी नदीवेस परिसरातील एका जुगारी अड्ड्यावर छापा टाकून २१ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, साहित्य व फर्निचर असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अड्ड्याचा मालक व जागामालकाच्या शोधात पोलीस असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नदीवेस नाका परिसरातील एका वाळू व फरशी विक्रीच्या दुकानालगत पत्र्याच्या शेडमध्ये सहारा सेवा आणि सांस्कृतिक संस्था आहे. संस्थेच्या नावाखाली येथे जुगार अड्डा चालू होता. पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे यांच्यासह त्यांच्या पथकाने आज, शनिवारी या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी तिथे अठराजण जुगार खेळत असल्याचे आढळले. पोलीस आल्याचे समजताच पळापळ झाली; पण पोलिसांनी सर्वांना पकडले.
अटक केलेल्यांची नावे : प्रमोद सुदाम माने (वय ३७, रा. तिळवणी), कासीम अमीन मुल्ला (४२, पाटील मळा, इचलकरंजी), इमाम आबालाल मुल्ला (४६, रिप्क्रिएशन हॉलजवळ), सुरेंद्र आदाप्पा देवमोरे (३५, देवमोरे मळा), शंकर तुकाराम शेंडे (३७, रांगोळी), इस्माईल जानीमियॉँ शेख (३५,माणकापूर), बसवराज अण्णाराव आदिमणी (३९, पुजारी मळा), सुधीर शांताराम फाटक (४२, पुजारी मळा), यशवंत बजरंग चव्हाण (३२, तिळवणी), संजयकुमार बाबूराव बोहरा (४६, सांगली नाका), राजू शंकर पाटील (३५, यशवंत कॉलनी), राजेश काडाप्पा कोकटनूर (४५, पुजारी मळा), सुरेश इराप्पा शेडशाळे (४६, गुरू कन्नननगर), विजय बबन पोवाळे (३६, संग्राम चौक), बाळू आप्पासाहेब बेनाडे (२६, तांबे माळ), दिलीप विठोबा लोणकर ( ५०, मंगळवार पेठ) नितीन मझलिंग कांबळे (३२, रांगोळी), प्रशांत वसंत माळी (२९, कबनूुर) व राजू गोपाळ पिठ्ठा (४५, जवाहरनगर) आदी. या सर्वांकडून ७२५० रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: Gambling raid; 21 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.