धमकीचा मोबाईल स्टेटस लावणारा युवक गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:36+5:302021-02-24T04:27:36+5:30

कोल्हापूर : मारहाणीमुळे संतप्त झालेल्या युवकाने चिडून रागाच्या भरात धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावला; पण मारहाण करणाऱ्यानेच त्याची ...

Gajaad youth with threatening mobile status | धमकीचा मोबाईल स्टेटस लावणारा युवक गजाआड

धमकीचा मोबाईल स्टेटस लावणारा युवक गजाआड

कोल्हापूर : मारहाणीमुळे संतप्त झालेल्या युवकाने चिडून रागाच्या भरात धमकी देणारा फोटोचा स्टेटस मोबाईलला लावला; पण मारहाण करणाऱ्यानेच त्याची तक्रार पोलिसांत दिली आणि स्टेटस लावणाऱ्या युवकास गजाआड जावे लागले. गणेश श्रीपती पाटील (वय २८, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे. ही घटना राजेंद्रनगरात घडली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश पाटील या युवकास त्याच्या मित्राने किरकोळ कारणांवरून बेदम मारहाण केली, त्यामुळे संतप्त झालेल्या पाटील याने रागाच्या भरातच मारहाण करणाऱ्याचा फोटो व त्यावर धमकी देणारे लाल रंगाचे चिन्ह करून तो आपल्या मोबाईलला स्टेटस लावला. त्यामुळे मित्राने तातडीने पोलीस ठाणे गाठले, पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने पाटील याला अटक केली.

Web Title: Gajaad youth with threatening mobile status