शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पूरकाळात घरफोडी करणारी टोळी गजाआड: तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:04 IST

प्रलयकारी महापुराच्या परिस्थितीत पूरग्रस्त भागांतील बंद घरांना लक्ष्य करून तब्बल ११ घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी (दि. ७) गजाआड केले.

ठळक मुद्दे पूरकाळात घरफोडी करणारी टोळी गजाआड: तिघांना अटकसंशयिताकडून ११ गुन्ह्यांची कबुली : सहा लाखांचा मुद्देमाल जप्त : पोलीस अधीक्षकांची माहिती

कोल्हापूर : प्रलयकारी महापुराच्या परिस्थितीत पूरग्रस्त भागांतील बंद घरांना लक्ष्य करून तब्बल ११ घरफोड्या करणाऱ्या टोळीला पोलिसांनी शनिवारी (दि. ७) गजाआड केले. या टोळीतील आकाश रघुनाथ चव्हाण (वय २७, रा. मूळ कोते, ता. राधानगरी, सध्या रा. वडणगे, ता. करवीर), योगेश बाबूराव संकपाळ (३१, रा. लोणार वसाहत, उचगाव, ता. करवीर) आणि धोंडिराम ऊर्फ रामा रंगराव पाटील (३३, रा. वडणगे, ता. करवीर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी  पत्रकार परिषदेत दिली. संशयितांनी ११ गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक देशमुख म्हणाले, ‘वडणगे येथील जौंदाळ मळा परिसरात ६ ते १० आॅगस्ट दरम्यान पुराचे पाणी आले होते. या ठिकाणी राहत असलेले विनोद प्रसाद जौंदाळ यांचे कुटुंबीय आणि शेजारील नागरिक नातेवाइकांच्या घरी राहण्यासाठी गेले होते.

दरम्यान, जौंदाळ यांचा आणि शेजारील नागरिकांचा बंद घराचा दरवाजा तोडून, संशयित चोरटे धोंडिराम पाटील, आकाश चव्हाण आणि योगेश संकपाळ यांनी लोखंडी तिजोरीतील सात तोळे अडीच ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले होते.

या गुन्ह्यात त्यांना करवीर पोलिसांनी अटक केली होती. संशयितांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. संशयितांकडून १९ तोळ्यांचे सोन्याचे, चांदीचे दागिने, देवदेवतांच्या पितळेच्या मूर्ती, कॉम्प्युटर आणि मोटारसायकल असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.’ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, प्रशांत माने, राजू जरळी, दीपक घोरपडे, गुरू झांबरे, सुहास पाटील, युक्ती ठोंबरे, राम माळी, सचिन बेंडखळे यांनी केली.करवीरसह राधानगरी तालुक्यातील घरफोड्या उघडअधिक तपासात संशयित चोरट्यांनी करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडणगे, चिखली, शिंगणापूर, नागदेववाडी, फुलेवाडी रिंग रोड, पीरवाडी, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, आर. के.नगर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच राधानगरी तालुक्यातील कोते गावातील मंदिरात व दूध डेअरी येथेही घरफोडी केल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKolhapur Floodकोल्हापूर पूर