मौजे वडगावच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गेल इंडिया तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:20+5:302020-12-30T04:31:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हेरले : मौजे वडगावचा सर्वांगीण विकास, मुलांच्या शैक्षणिक, वैद्यकीय कामासाठी गेल इंडिया कंपनी नेहमी तत्पर राहील, ...

GAIL India is ready for the educational and economic development of Mauje Wadgaon | मौजे वडगावच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गेल इंडिया तत्पर

मौजे वडगावच्या शैक्षणिक, आर्थिक विकासासाठी गेल इंडिया तत्पर

लोकमत न्यूज नेटवर्क

हेरले : मौजे वडगावचा सर्वांगीण विकास, मुलांच्या शैक्षणिक, वैद्यकीय कामासाठी गेल इंडिया कंपनी नेहमी तत्पर राहील, असा विश्वास कंपनीचे कार्यकारी निर्देशक पी. मुरुगेसन यांनी व्यक्त केला. येथील पाझर तलाव रस्त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ कांबळे होते.

मुरूगेसन म्हणाले की, मौजे वडगावने गेल इंडिया कंपनीवर विश्वास ठेवून कंपनीच्या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याबद्दल कंपनी नेहमीच गावाच्या विकासासाठी पुढे येईल. कंपनीच्या सीएसआर फंडातून गाव ते पाझर तलावदरम्यानच्या रस्त्यासाठी ३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी दिला आहे. हा रस्ता होण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातून या रस्त्यासाठी सहमती दिली. त्याबद्दल त्यांचे मुरूगेसन यांनी आभार मानले.

यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, तंटामुक्त समिती अध्यक्ष महेंद्र कांबरे यांनी मनोगत व्यक्त केले

यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर कन्स्ट्रक्शन ए. अनबर्सन, चीफ मॅनेजर मार्केटिंग वासनिक, डेप्युटी जनरल मॅनेजर कोल्हापूर टी. राजकुमार, चीफ मॅनेजर मनोहर जोशी, राजेंद्र नारनवरे, डाॅ. सोनाली पाटील, उपसरपंच सुभाष अकिवाटे, किरण चौगुले, विजय मगदूम, मानसिंग रजपूत, उदय चौगुले आदी उपस्थित होते. आभार राजू थोरवत यांनी मानले.

फोटो:-

मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील मौजे वडगाव ते पाझर तलाव रस्त्याचे उद्घाटन करत असताना सरपंच काशिनाथ कांबळे व गेल इंडिया कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: GAIL India is ready for the educational and economic development of Mauje Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.