शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फक्त बेड टाकून दिखावा, अत्यावश्यक गोष्टीही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 22:49 IST

पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअ‍ॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देगगनबावड्याचे कोविड सेंटर नावालाच-सुविधांची वानवा

चंद्रकांत पाटील ।गगनबावडा : देशभरात कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रशासनाने आरोग्ययंत्रणा मजबूत करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक तालुका पातळीवर कोविड केअर सेंटर तयार करण्यात आली आहेत; परंतु गगनबावड्यातील कोविड केअर सेंटर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच सध्याची स्थिती आहे.

गगनबावडा तालुक्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या सहा आहे. यापैकी दोन रुग्ण कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित चार कोरोनाबाधित रुग्ण गगनबावडा येथील सेंटरमध्ये दाखल आहेत. गगनबावडा येथे सुरू असलेल्या या सेंटरमध्ये मात्र या रूग्णांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून पेशंट आणि इतर क्वारंटाईन केलेल्या लोकांना वेळेवर जेवण, पाणी उपलब्ध होत नाही. रुग्णांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना औषधांचा एक डोस देण्यात येतोय. पुरेसा आहार नसल्याने औषधोपचार तरी कसा करायचा असा प्रश्न येथे कार्यरत असणाऱ्या वैद्यकीय स्टाफसमोर आहे. उपाशीपोटी औषधोपचार केला आणि औषधाची रिअ‍ॅक्शन आली तर त्याला जबाबदार कोण या भीतीपोटी डॉक्टर औषधोपचार करणेही टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे.

देखरेखीसाठी ठेवलेला पोलीस स्टाफ देखील संसर्ग होऊ नये या भीतीपोटी बिल्डिंग प्रवेशच करत नसून, सेंटरमध्ये ते काही चाललय ते बाहेरून बघण्यापलीकडे काहीच करत नसल्याचे दिसत आहे.

सध्या या ठिकाणी ९० लोक क्वारंटाईन असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार यांनी दिली आहे. कोव्हिड केअर सेंटरची संपूर्ण जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली असून कायम सेवेत असलेले कर्मचारी बाहेरूनच सूचना देण्याचे काम करत आहेत. या ठिकाणी कोरोनोबाधित रुग्ण भरती केले असून त्यांच्यासाठी गरज पडल्यास एकही व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आलेले नाही. केवळ बेड टाकून आरोग्य यंत्रणा सुसज्ज असल्याचा दिखावा केला जात असला तरी आतील परिस्थिती मात्र पूर्णत: विरोधी आहे.

आरोग्य सेवेसंदर्भात तालुका आरोग्याधिकारी विशाल चोकाककर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुरुवातीला याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ही सर्व माहिती तहसीलदार यांच्याकडून घेण्यास सांगितले. कोविड सेंटरवर चार डॉक्टर आणि आठ नर्सिंग स्टाफ कार्यरत असल्याचे चोकाककर यांनी सांगितले. पेशंट आणि क्वारंटाईन केलेले लोक यांच्या आरोग्यव्यवस्थेची जबाबदारी आरोग्य विभागाकडे आहे. सेंटरच्या साफसफाईची जबाबदारी बीव्हीजी ग्रुप आणि पंचायत समिती यांच्याकडे आहे. जेवणाची व्यवस्था तहसीलदार कार्यालयाकडून केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या सेंटरमध्ये रुग्ण दाखल झाले नव्हते, तेव्हा प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी भेट देत होते; परंतु जेव्हा रुग्ण दाखल केला गेला, तेव्हापासून वरिष्ठांनी कंत्राटी कर्मचाºयांच्या भरवशावर हे सेंटर सोडले आहे. गगनबावडा सेंटरच्या नोडल आॅफिसर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनीही या सेंटरकडे पाठ फिरवली असून, केवळ कागदोपत्री आणि फोनवरून सूचना देण्याचे काम केल्याचे सेंटरमधील एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

वाढते रुग्ण : तरीही दुर्लक्षचसेंटरमध्ये तिसऱ्या मजल्यावर कोरोनाबाधित पेशंट असून त्याच्या खालच्या मजल्यावर क्वारंटाईन करण्यात आलेले लोक आहेत. कोरोनाबाधित हे पूर्ण बिल्डिंगमध्ये क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त आहे.कोविड सेंटरवर चार डॉक्टर आणि आठ नर्सिंग स्टाफ कार्यरत. सेंटरचा सर्व कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर. वरिष्ठ

अधिका-यांनी फिरवली पाठ.वैद्यकीय सुविधांसह आहार, पाणी, औषधांची तातडीने सोय करण्याची गरज

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल