गडहिंग्लजच्या पी.सी. पाटील पतसंस्थेतर्फे कल्याण निधी वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:19+5:302021-05-11T04:24:19+5:30
येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदांच्या वारसांना सभासद कल्याण निधी वितरीत करण्यात आला. यावेळी मयत ...

गडहिंग्लजच्या पी.सी. पाटील पतसंस्थेतर्फे कल्याण निधी वितरीत
येथील पी. सी. पाटील गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे मयत सभासदांच्या वारसांना सभासद कल्याण निधी वितरीत करण्यात आला. यावेळी मयत सभासद अंकुश यांच्या पत्नी सुखदेवी कांबळे यांच्याकडे निधी सुपूर्द करण्यात आला.
संस्थेचे सभासद अंकुश विठोबा कांबळे यांचे महिन्यापूर्वी निधन झाले आहे. संस्थेने सभासदांच्या सुरक्षिततेसाठी सभासद कल्याण निधी ही योजना सुरू केली आहे.
या योजनेतंर्गत सभासद सेवेत असताना मयत झाल्यास त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे. कर्ज नसल्यास वारसांना दीड लाखाचा निधी देणे अशी तरतूद संस्थेने उपविधीमध्ये केली आहे.
यावेळी सभापती नंदकुमार वाइंगडे, उपसभापती विनायक पोवार, चिटणीस सुधीर शिवणे आदींसह संचालक व कर्मचारी उपस्थित होते.
----------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे पी.सी. पाटील गुरुजी पतसंस्थेतर्फे सुखदेवी कांबळे यांना सभासद कल्याण निधीचा धनादेश नंदकुमार वाइंगडे यांनी सुपुर्द केला. यावेळी आप्पा शिवणे, विनायक पोवार व कर्मचारी उपस्थित होते.
क्रमांक : १००५०२०२१-गड-०१