शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

गडहिंग्लजला ‘महाआघाडी’चेच आव्हान !

By admin | Updated: September 1, 2016 00:38 IST

राष्ट्रवादीला वर्चस्वासाठी झगडावे लागणार : काँगे्रस, जनता दलाचा अस्तित्वासाठी संघर्ष, चव्हाण-शहापूरकरांच्या ‘भाजप’ प्रवेशाने राजकारणाला कलाटणी

राम मगदूम -- गडहिंग्लज साखर कारखाना निवडणुकीप्रमाणेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतदेखील राष्ट्रवादीसमोर ‘महाआघाडी’चेच आव्हान कायम राहील. त्यामुळे राष्ट्रवादीला वर्चस्वासाठी, तर गटबाजीमुळे अस्तित्वहीन झालेल्या काँगे्रसला आणि ग्रामीण भागात प्रभावहीन ठरलेल्या जनता दलाला स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागणार आहे.गडहिंग्लज तालुक्याची चंदगड व कागल विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली आहे. नूल, हलकर्णी, भडगाव व नेसरी हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ चंदगडमध्ये, तर कडगाव जि. प. मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर गतवेळी झालेल्या पहिल्या निवडणुकीतदेखील तालुक्यातील जि.प.च्या पाचही जागा आणि पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा जिंकून राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिद्ध केले होते.राष्ट्रवादीने गतवेळी जि.प. व पं.स.ची निवडणूक तालुक्यात स्वतंत्रपणे लढविली होती. राष्ट्रवादीच्याविरोधात काँगे्रस, जनसुराज्य व जनता दल अशी दुरंगी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेदेखील काही जागा स्वबळावर लढविल्यामुळे काही ठिकाणी ही निवडणूक तिरंगी झाली होती. मात्र, त्यावेळीही राष्ट्रवादीनेच बाजी मारली होती.दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व जनता दलाचे माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे हे दोघेही अलीकडेच झालेल्या गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र आले. त्यावेळी त्यांच्याविरोधात एकत्र आलेल्या चव्हाण आणि शहापूरकर यांच्या महाआघाडीलाही पालकमंत्री चंद्रकांतदादांच्या पाठबळामुळे बऱ्यापैकी यश मिळाले. त्यानंतर आता त्या दोघांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला तालुक्यात ‘चेहरा’ आणि ‘बळ’ मिळाले आहे.गतवेळी गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकणारे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर आणि प्रमुख कार्यकर्ते अप्पी पाटील या दोघांनीही राष्ट्रवादीच्या उमेदवार संध्यादेवींना कडवे आव्हान दिले होते. ते दोघेही या निवडणुकीतदेखील कारखाना पॅटर्ननुसार राष्ट्रवादीच्या विरोधातील महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यावेळची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहे.महाआघाडीचा प्रयोग गडहिंग्लज कारखान्याच्या निवडणुकीत आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या विरोधात प्रकाश चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर गट आणि भाजप व शिवसेना एकत्र आले होते. त्याचवेळी राजकीय समीकरणांच्या बदलाची नांदी झाली होती. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी चव्हाण व शहापूरकरांनी ‘भाजप’मध्ये प्रवेशाची घोषणा केली आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या धर्तीवर पुन्हा ‘राष्ट्रवादी व जनता दला’च्या विरोधात ‘भाजप’कडून महाआघाडीचा प्रयोग होईल. कारखान्यासाठी स्वतंत्र लढलेली स्वाभिमानी संघटनादेखील त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.पं.स. मतदारसंघ (कंसात पक्ष)नेसरी - हेमंत कोलेकर (‘जनसुराज्य’कडून निवडून आले आता ‘भाजप’मध्ये), बुगडीकट्टी - सरिता तानाजी पाटील (‘राष्ट्रवादी’कडून निवडून आलेल्या आता ‘शिवसेने’चे संग्रामसिंह कुपेकर समर्थक), कडगाव - मीनाताई सदानंद पाटील (राष्ट्रवादी), गिजवणे - स्नेहल शंकर गलगले (राष्ट्रवादी), भडगाव -अमर चव्हाण (राष्ट्रवादी), महागाव - रजनी विजय नाईक (‘राष्ट्रवादी’कडून निवडून आलेल्या आता अप्पी पाटील यांचे समर्थक), नूल - इकबाल काझी (राष्ट्रवादी), हसूरचंपू - तानाजी कांबळे (राष्ट्रवादी), हलकर्णी - अनुसया सुतार (राष्ट्रवादी), बसर्गे - बाळेश नाईक (जनता दल)