शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

गडहिंग्लज आठवडा बाजाराची जागाच बदलायला हवी..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 10:22 IST

Traffic Market Gadhinglaj Kolhapur- गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे भाजी-फळ विक्रेत्यांसह अन्य फिरत्या विक्रेत्यांच्या बैठकीच्या जागेची पर्यायी व्यवस्था करायला हवी. यासाठी चर्च रोड हाच एकमेव पर्याय असून शहरातील व्यापारी संघटना, पालिका व पोलिसांनी त्याचा विचार व नियोजन करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देवाहतुकीची कोंडी, चर्च रोडचा पर्यायपालिका-पोलिसांनी नियोजन करावे

शिवानंद पाटील

गडहिंग्लज  : गडहिंग्लजला दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या बैठकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे शहरातील मेन रोडसह बाजारपेठेतही बाजाराच्या दिवशी वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे भाजी-फळ विक्रेत्यांसह अन्य फिरत्या विक्रेत्यांच्या बैठकीच्या जागेची पर्यायी व्यवस्था करायला हवी. यासाठी चर्च रोड हाच एकमेव पर्याय असून शहरातील व्यापारी संघटना, पालिका व पोलिसांनी त्याचा विचार व नियोजन करण्याची गरज आहे.सीमाभागातील एक महत्वाची बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. याठिकाणी जनावरांचाही मोठा बाजार भरतो. त्यामुळे आजरा, चंदगडसह कर्नाटकातील शेतकरी, व्यापारी व ग्राहक गडहिंग्लजच्या बाजारात मोठ्या संख्येने येतात. आठवडा बाजारात कोट्यवधी रूपयांची उलाढाल याठिकाणी होते.परंतु, बाजाराच्या बैठकीचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे विक्रेते शहरातील विविध रस्त्यांवर ठिकठिकाणी बसतात. त्यामुळे म. दुं. श्रेष्ठी विद्यालय ते वीरशैव बँक, वीरशैव बँक, वीरशैव बँक ते नेहरू चौक, नेहरू चौक ते अहिल्याबाई होळकर चौक, महालक्ष्मी स्वीट मार्ट ते टिळक पथ, गंगा मेडीकल ते गुणे गल्ली, शिवाजी बँक ते कदम मेडीकल, कचेरी रोड आणि पाण्याच्या टाकीचा परिसर, साधना बुक स्टॉल ते बँक आॅफ इंडिया या रोडवर बाजार भरतो.

दर रविवारी दसरा चौक ते मुसळे कॉर्नरपर्यंतची वाहतूक बंद राहते. त्याचबरोबर बाजार भरणाºया सर्व रस्त्यांवरदेखील सायकल व दुचाकीदेखील नेता येत नाही. म्हणूनच बाजाराचे पर्यायी नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

 अशी करता येईल पर्यायी व्यवस्थाशानभाग हॉस्पिटल ते कडगांव रोडवरील भगवा चौक पर्यंतचा रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजीविक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. याशिवाय पोलिस ठाणे परिसर व चर्चरोडपासून दोनही बाजूला जाणाºया अंतर्गत रस्त्यांवर फळ, भाजीपाला, कापड विक्रेते, मसाले, चप्पल विक्रेते आदींसह अन्य किरकोळ विक्रेत्यांची व्यवस्था करता येईल. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गासह बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.

वाहनांच्या पार्कींगची व्यवस्थाबाजाराच्या दिवशी पोलिस परेड मैदान, बॅ. नाथ पै विद्यालय मैदान व एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर याठिकाणी चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था केल्यास बाजारात कोठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांनाही सोयीचेबाजाराच्या दिवशी मुसळे कॉर्नर ते अभिरूची स्वीट मार्टपर्यंतचा रस्ता चारचाकींसाठी बंद ठेवला जातो. त्यामुळे बाहेरून चारचाकीतून येणारे प्रवाशी शहरातील कुठल्याही रोडवरून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेही वाहतुकींची कोंडी होते. पर्यायी व्यवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांनाही नेहमीप्रमाणे शहरातून बाहेर पडता येईल.

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूरTrafficवाहतूक कोंडी