गडहिंग्लज युनायटेडला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST2021-02-23T04:36:40+5:302021-02-23T04:36:40+5:30

गडहिंग्लज : येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' संघाने कोल्हापूर प्रॅक्ट्रिस क्लबचा २-१ ने पराभव करून मानाचा युनायटेड चषक व ...

Gadhinglaj United win | गडहिंग्लज युनायटेडला विजेतेपद

गडहिंग्लज युनायटेडला विजेतेपद

गडहिंग्लज : येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' संघाने कोल्हापूर प्रॅक्ट्रिस क्लबचा २-१ ने पराभव करून मानाचा युनायटेड चषक व रोख १५ हजार रुपये पटकाविले. स्थानिक नवज्योत क्लब संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. शहरातील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.

अंतिम सामन्यात चौथ्याच मिनिटाला प्रॅक्ट्रिसचा ओमकार जाधवने गोलक्षेत्राबाहेरून मैदानी गोल करून आघाडी घेतली. उत्तरार्धात युनायटेडच्या खेळाडूंनी झुंजार खेळ करून वर्चस्व मिळविले. २२ व्या मिनिटाला प्रथमेश धबालेने गोलरक्षकाला चकवून गोल करून स्पर्धेत बरोबरी करून रंगत आणली. उत्साह दुणावलेल्या बर्थ डे बॉय प्रथमेशने पुन्हा २८ व्या मिनिटाला वैयक्तिक व संघाचा दुसरा गोल करून आघाडी घेतली. याच गोलफरकावर संघाने विजेतेपद पटकाविले.

उपांत्य सामन्यात प्रॅक्ट्रिस क्लबने युनायटेड ब संघावर, तर युनायटेड 'अ' संघाने नवज्योत क्लब संघावर मात केली.

विजेत्या संघाला सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी, नगरसेवक दीपक कुराडे यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी रश्मीराज देसाई, रवींद्र राठोड, अभिजित पाटील, नंदकुमार पाटील, अरविंद बार्देस्कर, मल्लिकार्जुन बेल्लद, सुनील चौगुले, महादेव पाटील, प्रशांत दड्डीकर उपस्थित होते.

दीपक कुपन्नावर यांनी स्वागत केले. भूपेंद्र कोळी याने सूत्रसंचालन केले. हुलाप्पा सूर्यवंशी यांनी आभार मानले.

--------------------------------------

* स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट -

प्रथमेश धबाले (स्पर्धावीर), ओमकार सुतार (गोलरक्षक), सुल्तान शेख (बचावपट्टू), जय कामत (मध्यरक्षक), विकास जाधव (आघाडीपटू) यांचा गौरव झाला.

--------------------------------------

फोटो ओळी :

गडहिंग्लज येथील फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या गडहिंग्लज युनायटेड 'अ' संघाला बक्षीस देऊन गौरविताना सहायक पोलीस निरीक्षक शरद माळी, अरविंद बार्देस्कर व दीपक कुराडे. शेजारी सुनील चौगुले, महादेव पाटील आदी उपस्थित होते. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २१०२२०२१-गड-०४

Web Title: Gadhinglaj United win