शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 17:29 IST

Bharat Bandh, Farmar, gadhinglj, kolhapurnews, traders शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे उद्या (मंगळवारी) अत्यावश्यक सेवा वगळून गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देगडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांचाही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा बैठकीत निर्णय : उद्या शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद

गडहिंग्लज : शेतकऱ्यांच्या देशव्यापी भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत एकमताने झाला. त्यामुळे उद्या (मंगळवारी) अत्यावश्यक सेवा वगळून गडहिंग्लज शहरातील सर्व दुकाने दिवसभर बंद राहणार आहेत.गडहिंग्लज चेंबर आॅफ कॉमर्सच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. उपनगराध्यक्ष महेश कोरी, नगरसेवक नरेंद्र भद्रापूर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. कोरी म्हणाल्या, देशच विकायला काढल्यासारखी परिस्थिती सध्या दिसत आहे. केंद्राच्या जनहितविरोधी कायदे व धोरणामुळे सर्वच घटकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.यावेळी हॉटेल व परमीट रूमचे अध्यक्ष अवधूत पाटील, बेकर्स असोसिएशनचे अध्यक्ष मुकूंद किनाती, नाभिक संघटनेचे संदीप झेंडे, टेलर असोसिएशनचे युनूस नाईकवाडे, कापड व्यापारी संघटनेचे प्रवीण पावले, सराफ असोसिएशनचे श्रीनिवास वेर्णेकर, पानपट्टी व्यापारी संघटनेचे भैरू गंधवाले, मेडीकल असोसिएशनचे संदीप मिसाळ, किराणा भुसार व्यापारी संघटनेचे राजेंद्र बस्ताडे, शेती सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष रवींद्र घेज्जी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.

गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंदरविवारी (६) भाजपा वगळता सर्वपक्ष संघटनांनी एकत्र येवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यापाठोपाठ गडहिंग्लजच्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी (८) गडहिंग्लज शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळला जाणार आहे.

गडहिंग्लज येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी यांनी मार्गदर्शन केले. शेजारी रवींद्र घेज्जी, युनूस नाईकवाडे, संदीप झेंडे, मुकूंद किनाती, अवधूत पाटील, राजेंद्र बस्ताडे उपस्थित होते.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदkolhapurकोल्हापूरFarmer strikeशेतकरी संप