१) ‘शिवराज’मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रारंभ
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या अॅडव्हान्स अकौंटन्सी व कला विभागाच्या मराठी, हिंदी, अर्थशास्त्र व समाजशास्त्र विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येत आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी दिली.
----------------------------------
२) ''''शिवराज''''मध्ये ऑनलाईन कार्यशाळा
गडहिंग्लज : शहरातील शिवराज महाविद्यालयात एन.आय.आय.टी व आय.सी.आय.सी.आय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ''''बँकिंग उद्योग'''' या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी एच. एच. देसाई यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी, मुलाखत तंत्र याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. दिग्विजय कुराडे, संदीप कुराडे, बाळासाहेब अजळकर, आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी स्वागत केले.
----------------------------------