गडहिंग्लज सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:06+5:302021-04-03T04:21:06+5:30
गडहिंग्लज : बसर्गे येथील पाटील वसाहतीमधील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ सरपंच भारती रायमाने यांच्या हस्ते झाला. ग्रामनिधीतून हा रस्ता ...

गडहिंग्लज सिंगल बातम्या
गडहिंग्लज : बसर्गे येथील पाटील वसाहतीमधील रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ सरपंच भारती रायमाने यांच्या हस्ते झाला. ग्रामनिधीतून हा रस्ता होत आहे. यावेळी उपसरपंच बसवराज कापसे, सुनील भुईंबर, ग्रामविकास अधिकारी कृष्णा सिताप, आनंद नांगनुरे, सविता चौगुले, विनायक पाटील आदी उपस्थित होते.
----------------------------------- २) कौलगे आरोग्य केंद्रात लसीकरणाची सोय
गडहिंग्लज : कौलगे येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणाची सोय करण्यात आल्याने नागरिक व वयोवृद्धांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कौलगेसह ऐनापूर, हिरलगे, बेळगुंदी गावातील नागरिकांची सोय झाली आहे. यापूर्वी या गावातील नागरिकांना लसीकरणासाठी १६ किलोमीटवरील महागाव येथे जावे लागत होते. या उपकेंद्रात आता १,५०० नागरिकांना लस देण्यात येणार असून लाभार्थींनी लसीकरण करून घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. व्ही. खन्ना यांनी केले. यावेळी सरपंच रेखा जाधव यांच्यासह आरोग्य कर्मचारी व ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते.
----------------------------------- ३) कोदाळीची यात्रा रद्द
गडहिंग्लज : कोदाळी (ता. चंदगड) येथे ५ ते ७ एप्रिल अखेर होणारी माउली देवाची वार्षिक यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देवस्थान समिती व ग्रा. पं. सदस्यांनी दिली. यावर्षी केवळ मानकरी व गुरव यांच्या उपस्थितीत देवीची पूजाआर्चा, अभिषेक व धार्मिक कार्यक्रम होतील.
----------------------------------- ४) मांडे मोटिव्हेटर्स संघ विजेता
गडहिंग्लज : उत्तूर (ता. आजरा) येथे उत्तूर क्रिकेट क्लबतर्फे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेत संतोष मांडे यांच्या मांडे मोटिव्हेटर्स संघाने विजेतेपद पटकाविले. तन्मय स्पोटर्सने द्वितीय तर ए. जे. स्पोटर्सने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्या संघाला सरपंच वैशाली आपटे, जि. प. सदस्य उमेश आपटे, माजी सरपंच रमेश ढोणुक्षे, सचिन फाळके, भारत लोखंडे आदींच्या हस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
----------------------------------- ५) अजिंक्यतारा ग्रुपला अजिंक्यपद
गडहिंग्लज : उत्तूर (ता. आजरा) येथे ७० किलो वजनी गटातील रस्सीखेच स्पर्धेत अजिंक्यतारा युवा ग्रुपने अजिंक्यपद पटकाविले. स्पर्धेत जय हनुमान (करंबळी) यांनी द्वितीय तर उत्तूरच्या वॉर्ड क्रमांक ६ ने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना जि. प. सदस्य उमेश आपटे, संदीप भोगण, सुधीर सावंत, तुषार घोरपडे, संदेश रायकर, अरूण कतोरे, पराग देशमाने आदींच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. अरूण कतोरे व जोतिबा पोवार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
----------------------------------- ६) सकल मराठा फाउंडेशनच्या तालुकाध्यक्षपदी मोहिते
गडहिंग्लज : येथील सकल मराठा फाउंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या तालुकाध्यक्षपदी प्रताप मोहिते यांची तर तालुका कार्याध्यक्षपदी सचिन हरळीकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकारिणीत संजय पत्की व विनायक दरेकर (तालुका उपाध्यक्ष), रमेश तिकोडे (सचिव), स्वप्निल चौगुले (शहराध्यक्ष) यांचा समावेश आहे. यावेळी सुदर्शन चव्हाण, सागर आपके, शशीकांत नांदवडेकर, सूरज बराटे आदी उपस्थित होते.
----------------------------------- ७) आगम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
गडहिंग्लज : आजरा तालुका कृषी विभागाकडील कृषी पर्यवेक्षक एस. एम. आगम यांचा सेवानिवृत्ती निमित्त उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. नंदकुमार कदम, गटविकास अधिकारी वाघ यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी कृषी अधिकारी के. एच. मोमीन, किरण पाटील, मंडल अधिकारी जी. व्ही. पाटील, मंडल अधिकारी डॉ. ऐतवडेकर, अनिल कांबळे, व्ही. एम. शिंत्रे आदी उपस्थित होते.