गडहिंग्लज सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:23 IST2021-03-26T04:23:40+5:302021-03-26T04:23:40+5:30
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले एटीएम लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. ...

गडहिंग्लज सिंगल बातम्या
हलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले एटीएम लवकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे. हलकर्णी भागात मोठी सेवा असलेली आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. मात्र, तांत्रिक कारणास्तव ते सहा महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे भागातील पेन्शनधारक अन्य बँकचे ग्राहक यांची मोठी गैरसोय होत आहे. गावात वीरशैव बँकेचे खासगी असे अन्य दोन एटीएम आहेत. मात्र रोख मर्यादेमुळे त्याची सेवा दीर्घकाळ राहत नाही. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन हे एटीएम सुरू करावे, अशी मागणी आहे.
--------------------------
२) हलकर्णीत चारा सुरक्षिततेची लगबग
हलकर्णी : गेल्या आठवड्यात वळीव पावसाची चिन्हे दिसत असल्याने जनावराच्या चारा सुरक्षित ठिकाणी रचण्याची लगबग हलकर्णी परिसरात होत आहे. अर्थात, भागात वळीवचा अत्यंत तुरळक शिडकावा झाला आहे. ज्वारी व मक्याचा कडबा कापून तो सुरक्षित ठिकाणी रचण्यात शेतकरी मग्न आहेत. सध्या ज्वारीचा कडबा (सुका चारा) महाग असून १५ रुपये गंजी असा दर आहे. अनेकांनी व्यवहार करून ठेवलेला चाराही गेल्या चार दिवसांपासून कापून सुरक्षितस्थळी नेण्याचे काम चालविले होते. हा चारा जनावरांसाठी पावसाळा संपेपर्यंत पुरविण्याचे नियोजन असते. त्यामुळे तो भिजू नये, याची विशेष काळजी घेतली जात आहे.