गडहिंग्लज पं. स. कर्मचारी पतसंस्थेला ३७ लाखांचा नफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:23 IST2021-05-10T04:23:24+5:302021-05-10T04:23:24+5:30
गडहिंग्लज : गडहिंग्लज पं. स. स्तरावरील जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३७ लाख ६ हजारांचा निव्वळ ...

गडहिंग्लज पं. स. कर्मचारी पतसंस्थेला ३७ लाखांचा नफा
गडहिंग्लज : गडहिंग्लज पं. स. स्तरावरील जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्षात ३७ लाख ६ हजारांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन दड्डीकर यांनी दिली.
दड्डीकर म्हणाले, संस्थेची एकूण उलाढाल १८ कोटी ४९ लाख ४७ हजार असून, ठेवी १४ कोटी १ लाख ६५ हजारांच्या आहेत. संस्थेचे खेळते भागभांडवल १ कोटी ३ लाख १५ हजार असून, ११ कोटी ७३ लाख ९३ हजारांचे कर्जे वितरित केली आहेत. चार कोटी ७१ लाख ९८ हजारांची संस्थेने गुंतवणूक केली आहे.
याकामी उपाध्यक्षा मंगल पाटील, प्रभाकर चौगुले, गंगाप्पा डंगी, विनायक काटकर, जनार्दन भोईर, विश्वास पाटील, गणपतराव दावणे, संतोष रावण, आदी उपस्थित होते.
राजन दड्डीकर : ०९०५२०२१-गड-०३
(कृपया फोटोसह बातमी वापरावी)